मुंबई : करोनाच्या तिसऱ्या लाटेत राज्यासह देशात रुग्णांची संख्या वाढल्यानंतरही गंभीर स्थिती निर्माण झाली नाही. करोना प्रतिबंधक लसीकरणामुळे अनेक रुग्ण घरीच बरे झाल्याचा दावा करण्यात आला. अशातच आता रुग्णसंख्येतही मोठ्या प्रमाणात घसरण होत असून मागील २४ तासांत राज्यात १ हजार ९६६ नवीन रुग्णांचं निदान झालं आहे. उपचार घेऊन रुग्ण लवकर बरे होत असल्याने सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के एवढा आहे. (Maharashtra Corona Cases Today)

राज्यात आज ११ हजार ४०८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण ७६ लाख ६१ हजार ०७७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६६ टक्के एवढं झालं आहे. राज्यात आज १२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,६५,२७,८९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,४४,९१५ (१०.२५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,४८,४०८ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ८१५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

abg shipyard fraud : २२ हजार कोटींच्या एबीजी घोटाळ्यावर केंद्राने दिली पहिली प्रतिक्रिया, सूचक इशारा देत सीतारामन म्हणाल्या…

मुंबईत काय आहे स्थिती?

राजधानी मुंबईतही गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत सातत्याने घट होताना पाहायला मिळत आहे. आज मुंबईत १९२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर ३५० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या मुंबईत २५१३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसंच मुंबई शहरातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८ टक्के इतकं आहे.

ओमिक्रॉनबाबत राज्यात काय आहे स्थिती?

राज्यात आज ८ ओमिक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण एकट्या मुंबई शहरातील असून भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था यांनी रिपोर्ट केले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण ३ हजार ९९४ ओमिक्रॉन विषाणूबाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी ३ हजार ३३४ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. आजपर्यंत एकूण ८ हजार ८०४ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी ७ हजार ५०७ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत आणि १२९७ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here