कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांमुळे चर्चेत आलेल्या त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी काही महिन्यांपूर्वी ‘शिवशक्ती सेना’ या नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली. करुणा मुंडे यांच्या पक्षाने महत्वपूर्ण निर्णय घेतला असून पक्षातर्फे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढवण्यात येणार आहे. पक्षाला सक्षम उमेदवार मिळाला नाही तर आपण स्वत: मैदानात उतरणार असल्याची माहिती करुणा मुंडे यांनी दिली आहे. (Dhananjay Munde Karuna Sharma News)

करुणा मुंडे या सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर होत्या. यावेळी त्या म्हणाल्या, ‘शिवशक्ती सेना’तर्फे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यात येणार आहेत. शिवाय कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक लढवली जाईल. इच्छुकांशी चर्चा सुरू आहे. कोणी सक्षम उमेदवार मिळाला नाही तर स्वत: निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभेच्या सर्व जागा आमच्या पक्षाच्या वतीने लढवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

Mumbai Crime: मुंबईतील दादरमध्ये बुरखाधारी चोर!; तपासात ‘ही’ धक्कादायक माहिती उघड

रुपाली चाकणकर यांच्यावर साधला निशाणा

सर्वच पक्षात आज घराणेशाही जोपासली जात आहे. आमचा घराणेशाहीला विरोध आहे असं सांगून करुणा मुंडे म्हणाल्या, ‘राज्यात महिला अत्याचारात वाढ झाली आहे. पण महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या मूग गिळून गप्प आहेत.’

दरम्यान, करुणा मुंडे यांनी अनेक गंभीर आरोप केल्यानंतर धनंजय मुंडे अडचणीत सापडले होते. त्यानंतर आता करुणा मुंडे या थेट निवडणुकीच्या राजकारणात उतरत असल्याने पुन्हा एकदा पती धनंजय मुंडे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here