जळगाव : जिल्ह्यात अवैधरित्या सुरू असलेल्या गावठी दारुच्या कारखान्यांवर कारवाईची मोहीम राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यात सोमवारी १९ ठिकाणी कारवाई करण्यात आली असून सुमारे २ लाख ३१ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. (Jalgaon Crime Latest Update)

जिल्ह्यात अवैध गावठी दारू कारखाने सुरू असून मोठ्या प्रमाणात दारू तयार करुन त्याची विक्री केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, विभागीय उपायुक्त उषा वर्मा, नाशिक विभागाचे अधीक्षक अर्जुन ओहोळ यांना मिळाली. त्यांनी तात्काळ हे अवैध दारू विक्रीचे अड्डे उद्ध्वस्त करण्याच्या सूचना सीमा झावरे यांना दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचार्‍यांच्या पथकासह नाशिक विभागाच्या भरारी पथकांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू असलेले अवैध गावठी व हातभट्टी दारू तयार करणाऱ्या कारखान्यांसह ढाबे अशा एकूण १९ ठिकाणी कारवाई केली आहे.

Sachin Vaze: सचिन वाझे कुणाला वाचवतोय?; चौकशी आयोगाचे अत्यंत महत्त्वाचे निरीक्षण

या कारवाईत ४ हजार २९० लीटर कच्चे रसायन, १३५ लीटर गावठी दारू असा एकूण २ लाख ३१ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, ही कारवाई पोलीस निरीक्षक अरुण चव्हाण, किरण पाटील, चंद्रकांत पाटील, सुजित कपाटे, पोलीस निरीक्षक विकास पाटील, माधव तेलंगे, रिंकेष दांगट, विलास पाटील, आनंद पाटील, सत्यविजय ठेंगडे, विठ्ठल लहाके, लोकेश गायकवाड, नरेंद्र पाटील, अजय गावंडे, कुणाल सोनवणे, शशिकांत पाटील, प्रकाश तायडे, नितीन पाटील यांच्या पथकाने केली.

रस्त्यालगतच्या ढाब्यांवरही कारवाईचा बडगा

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जळगाव, चाळीसगाव, भुसावळ या पथकांसह नाशिकच्या भरारी पथकाने पाचोरा तालुक्यातील गिरड, भडगाव तालुक्यातील टोणगांव, पारोळा तालुक्यातील तामसवाडी, चोपडा तालुक्यातील खाचणे या ठिकाणावरील अवैध हातभट्टी दारू निर्मितीच्या केंद्रावर तर मालेगाव तालुक्यातील महामार्गाच्या बाजूने असलेल्या ढाब्यांवर देखील कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here