मुंबई: मुंबईतील शिवसेना भवनात आज, मंगळवारी पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेच मोठा गौप्यस्फोट होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारणा केली असता, ‘सौ सुनार की एक लोहार की’…असं ते म्हणाले. मुंबईत ईडीने छापे मारले असून, त्याबाबतही त्यांनी भाष्य केले. राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात काही असेल तर तपास यंत्रणांना सहकार्य करण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी सांगितले.

मुंबईत शिवसेना भवनात आज पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत शिवसेनेकडून मोठा गौप्यस्फोट होणार असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तसे संकेत दिले आहेत. या पत्रकार परिषदेआधी संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी पत्रकार परिषदेबाबत विचारणा केली. त्यावर ‘सौ सुनार की एक लोहार की’, असा इशारा त्यांनी दिला.

‘आता जगायचे कशाला’ हा प्रश्न अण्णा हजारे यांना तेव्हा पडला नाही का; शिवसेनेचा सणसणीत टोला
Sanjay Raut: संजय राऊत कोणाला जेलमध्ये पाठवणार, ‘ती’ साडेतीन लोकं कोण?; शिवसेना भवनातील पत्रकारपरिषदेकडे साऱ्यांचे लक्ष

‘महाराष्ट्रातील नेत्यांची नावं घुसवतील’

दक्षिण मुंबईत ईडीने छापे मारले आहेत. काही राजकीय नेत्यांची नावं रडारवर असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत विचारलं असता, राऊत म्हणाले की, नावं समोर येतील की घुसवली जातील, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राष्ट्राच्या सुरक्षेसंदर्भात काही विषय असतील, काही गंभीर असेल तर केंद्रीय तपास यंत्रणांना सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंडमधील कारवायांबाबत मोठा प्रश्न आहे. त्यावर मी आता बोलणार नाही, असंही ते म्हणाले. राष्ट्रीय एकात्मता, सुरक्षा, अंतर्गत सुरक्षा हे गंभीर आणि नाजूक विषय असतात. त्याचा तपास सुरू असताना त्यावर फार काही बोलणे योग्य नाही, असेही राऊत यांनी सांगितले.

राज ठाकरेंच्या नावापुढे हिंदुहृदयसम्राट असा उल्लेख, बॅनरची जोरदार चर्चा

ईडी गुजरातमध्ये कधी जाणार?

ईडीकडे राष्ट्रीय सुरक्षेबाबत काही माहिती असेल, आणि ईडी कारवाई करत असेल तर तिचं स्वागत केले पाहिजे. ईडी देशासाठी आहे, कुणा राजकीय पक्षासाठी नाही. गुजरातमध्ये इतका मोठा घोटाळा झाला आहे. देशातील सर्वात मोठा बँकेचा घोटाळा आहे. ईडी तिकडे कधी जातेय, याची आम्ही वाट बघतोय. दोन वर्षांपासून हा घोटाळा कोण दाबायचा प्रयत्न करत आहे. ती लोकं कोण आहेत, ज्यांनी फाइल पण उघडून दिली नाही. मुख्य आरोपी कसे पळाले? ईडी गुजरातमध्ये कधी जाणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Maratha reservation: मराठा आरक्षणावरून संभाजीराजे पुन्हा आक्रमक, मुंबईत मोठी घोषणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here