किरीट सोमय्या यांनी नोटीस मिळाल्यानंतर २४ तासांत लेखी माफी मागावी. अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार राहावे, असे कंपनीने म्हटले आहे. आमच्या कंपनीला कोव्हिड सेंटरचे कंत्राट हे कायदेशीर प्रक्रियेने मिळाले होते.

 

kirit covid centre

आमच्या कंपनीला कोव्हिड सेंटरचे कंत्राट हे कायदेशीर प्रक्रियेने मिळाले होते. त्यामुळे कुठल्याही यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी झाली तरीही आम्ही त्यासाठी तयार आहोत.

हायलाइट्स:

  • किरीट सोमय्या मुंबईच्या आझाद मैदानात पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत
  • कोव्हिड सेंटरच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला
मुंबई: पुणे आणि मुंबईतील कोव्हिड केंद्रांच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असा आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांना आता कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. कोव्हिड केंद्रांचे कंत्राट मिळालेल्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीकडून सोमय्या (Kirit Somaiya) यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसने किरीट सोमय्या यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. किरीट सोमय्या यांनी नोटीस मिळाल्यानंतर २४ तासांत लेखी माफी मागावी. अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार राहावे, असे कंपनीने म्हटले आहे. आमच्या कंपनीला कोव्हिड सेंटरचे कंत्राट हे कायदेशीर प्रक्रियेने मिळाले होते. त्यामुळे कुठल्याही यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी झाली तरीही आम्ही त्यासाठी तयार आहोत, असे लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता यावर किरीट सोमय्या काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल. ( Lifeline Hospital Management Services send notice to bjp leader Kirit Somaiya)
‘करोनाच्या भयावह काळात आम्ही मदतीसाठी पुढे सरसावलो; आता सोमय्या आमच्यावर वाट्टेल ते आरोप करतायत’
तर दुसरीकडे किरीट सोमय्या हे कोव्हिड सेंटरमध्ये झालेल्या रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानात पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत. कोव्हिड सेंटरचे कंत्राट कोणताही अनुभव नसलेल्या आणि बनावट कंपनीला देण्यात आले. त्यामुळे कोव्हिड सेंटरमध्ये अनेक रुग्णांचे मृत्यू झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. कोव्हिड सेंटरच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. त्यापैकी ३० ते ३५ कोटी रुपये दिल्याचे पुरावे माझ्याकडे असल्याचा दावाही किरीट सोमय्या यांनी केला आहे.

कोविड सेंटरचं 100 कोटींचं कंत्राट मुंबईच्या चहावाल्याला; सोमय्यांचा खळबळजनक दावा

‘किरीट सोमय्या राजकीय फायद्यासाठी आमच्यावर वाट्टेल ते आरोप करतायत’

किरीट सोमय्या यांच्या आरोपांच्या मालिकेनंतर लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीने एक पत्रक प्रसिद्ध करुन आपली बाजू मांडली होती. करोनाची पहिली लाट शिगेला असताना मार्च आणि एप्रिल २०२० मध्ये देशात भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी कसलीच शाश्वती नव्हती. अशावेळी आम्ही आणि काही समाजसेवक कोव्हिड सेंटर स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र, आज राजकीय फायद्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आम्हाला लक्ष्य करत आहेत, अशा शब्दांत लाईफलाईन कंपनीने उद्विग्नता व्यक्त केली होती.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : covid centre scam company send notice to bjp kirit somaiya asks to apologies give 24 hours ultimatum
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here