नाशिकमधून शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना
मुंबईच्या शिवसेना भवनात दुपारी चार वाजता पत्रकारपरिषद होणार आहे. या पत्रकारपरिषदेच्या पार्श्वभूमीवर नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील नेते आणि कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. संजय राऊत यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही मुंबईला जात असल्याची प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिली. या शिवसैनिकांमध्ये महिलांचा मोठ्या संख्येने समावेश आहे. राज्याच्या इतर भागांमधूनही शिवसेनेचे कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार आहेत. त्यामुळे आज शिवसेना भवनात काय घडणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
दुपारनंतर सगळे चॅनल संजय राऊत टेकओव्हर करतील: सुप्रिया सुळे
संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मिष्किल टिप्पणी केली. त्या पुण्यातील कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते. तुम्ही तुमचं चॅनल आमच्या कॉमेंट्सवर चालवता. मग तुम्ही आम्हाला पैसे द्यायला हवेत, असे सुळे यावेळी म्हणाल्या. मात्र, आता जे काही करायचे आहे ते तीन वाजण्याच्या आत करु, तीन वाजल्यानंतर संजय राऊत सगळे चॅनल टेकओव्हर करतील. ३ नंतर संजय राऊत यांचा सिक्सर आहे. त्यामुळे दादा आपण आत्ताच आपली पब्लिसिटी करु, असे सुप्रिया सुळे चंद्रकांत पाटील यांना उद्देशून म्हणाल्या.