नागपूर : राज्यात सध्या तरुणांमधील नैराश्य वाढत चाललं आहे. याचाच एक धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये समोर आला आहे. भीमनगर इथे १८ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे.
रविवारी सकाळी तिची आई कामाला गेली. बहीण लग्नाला गेली. दुपारी कोमलने पंख्याला साडी बांधून गळफास घेतला. घरमालकीनने कोमलला आवाज दिला असता प्रतिसाद मिळाला नाही. खिडकीतून बघितले असता ती गळफास लावलेली दिसली. त्यानंतर जमलेल्या शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून कोमलचा गळफास काढला. तिला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. तिच्या आत्महत्येमागील कारण कळू शकले नाही. अजनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.