या पत्रकार परिषदेत संजय राऊत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात भूकंप घडवणारे गौप्यस्फोट करु शकतात. यादृष्टीने संपूर्ण राज्याचे या पत्रकार परिषदेकडे लक्ष लागले आहे. संजय राऊत यांच्या Press conference चे Live updates

 

Live Shivsena

ही पत्रकारपरिषद शिवसेनेची असली तरी याचा मुख्य आकर्षण बिंदू हे संजय राऊत हेच आहेत.

हायलाइट्स:

  • संजय राऊत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात भूकंप घडवणारे गौप्यस्फोट करु शकतात
  • संजय राऊत या पत्रकार परिषदेत नेमकं काय बोलणार
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांचे कुटुंबीय आणि निकटवर्तीयांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून लक्ष्य करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना भवनात आज पत्रकारपरिषद आयोजित करण्यात आलेली आहे. ही पत्रकारपरिषद शिवसेनेची असली तरी याचा मुख्य आकर्षण बिंदू हे संजय राऊत (Sanjay Raut) हेच असतील. या पत्रकार परिषदेत संजय राऊत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात भूकंप घडवणारे गौप्यस्फोट करु शकतात. यादृष्टीने संपूर्ण राज्याचे या पत्रकार परिषदेकडे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, आमदार आणि खासदार याठिकाणी उपस्थित राहणार आहेत. संजय राऊत यांनी भाजपच्या ‘साडेतीन लोकांचा’ उल्लेख करुन सर्वांची उत्सुकता वाढवली होती. या नेत्यांना तुरुंगात जावे लागेल, असे राऊत यांनी म्हटले होते. तसेच संजय राऊत यांनी सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांवरही अनेक आरोप केले होते. त्यामुळे आता संजय राऊत या पत्रकार परिषदेत नेमकं काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. (Shivsena MP Sanjay Raut Live press conference)

Live updates:

* राज्यभरातील शिवसेना कार्यकर्त्यांना पत्रकार परिषद पाहण्यासाठी शिवसेना भवनाबाहेर एलईडी लावले
* वाहतूक खात्याकडून पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
* वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आधीच वाहतूक पोलिसांकडून विशेष खबरदारी
* शिवसेना भवनातील पत्रकारपरिषदेमुळे वाहतुकीच्या मार्गात बदल
* शिवसैनिकांनी परिधान केले झुकेंगे नहीचे टी-शर्ट

* शिवसेना भवनात शिवसैनिकांची गर्दी जमायला सुरुवात

* थोड्याचवेळात संजय राऊत ‘सामना’च्या कार्यालयातून शिवसेना भवनाकडे रवाना होणार

* शिवसेना भवनात पत्रकारपरिषदेची तयारी पूर्ण


जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : live shivsena press conference live updates sanjay raut press shivsena bhavan press conference may target ed bjp kirit somaiya
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here