मुंबई: कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याचा खास छोटा शकीलच्या मेहुणा सलीम फ्रुट याला ईडीनं ताब्यात घेतलं आहे. ईडीचे अधिकारी त्याला दक्षिण मुंबईतील कार्यालयात घेऊन गेले आहेत. त्याची चौकशी सुरू आहे. सलीम फ्रुटकडे मनी लाँड्रिंग (Money Laundering) प्रकरणात चौकशी करण्यात येत आहे.

तत्पूर्वी, मुंबईत आज मंगळवारी पहाटेपासूनच ईडीने मुंबईत ठिकठिकाणी छापे मारले. दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्या घरी आणि अन्य संबंधित ठिकाणांवर झाडाझडती घेतली. मुंबईतील दहा ठिकाणांवर ईडीच्या पथकांनी छापे मारले. सूत्रांच्या माहितीनुसार, ईडीकडून राजकीय पक्षांचे नेते आणि अंडरवर्ल्डशी संबधित ही छापेमारी करण्यात येत आहे. ईडी आणि एनआयएने संयुक्तपणे ही कारवाई सुरू केली आहे, असे समजते.

मुंबईत ईडीचं धाडसत्र सुरु, संजय राऊत म्हणाले…

हसीना पारकरच्या घरी छापा

ईडीने मंगळवारी मुंबईत अनेक ठिकाणी छापे मारले. सूत्रांच्या माहितीनुसार, कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्या घरी, तसेच तिच्याशी संबंधित मालमत्तांच्या ठिकाणी मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात येत आहे. अंडरवर्ल्डमधील काही कुख्यात गुंड आणि काही राजकीय नेत्यांचे संबंध असल्याचे तपासात उघड झाल्यानंतर ईडीकडून ही कारवाई करण्यात येत आहे.

Breaking: ईडी आणि ‘एनआयए’ची मुंबईत छापेमारी; १० ठिकाणांवर धाडी

राजकीय पक्षांचे नेते रडारवर

मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडी आणि एनआयएकडून मुंबईत छापे मारण्यात आले. दाऊद इब्राहिमशी संबंधित काही ठिकाणी ईडीने छापे मारले आहेत. दाऊदची बहीण हसीना पारकरच्या घरीही ईडीचे पथक पोहोचले. दुसरीकडे या प्रकरणात गुन्हेगारी जगतातील कुख्यात गुंड आणि काही राजकीय नेत्यांचे संबंध असल्याचे तपासातून समोर आले होते, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे काही राजकीय नेते या प्रकरणात ईडीच्या रडारवर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, विदेशात पळून गेलेल्या दाऊदचे मुंबईत अनेक व्यवसाय आहेत. काही दिवसांपूर्वीच पंजाबमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये डी कंपनी सामील असल्याचे आढळून आले होते. केंद्रीय तपास यंत्रणांनी काही दिवसांपूर्वीच सन १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अबु बकर याला युएईमधून ताब्यात घेतले होते.
विम्याचे पैसे उकळण्यासाठी डॉक्टरच्या नावाने बनावट कागदपत्रे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here