देशभरात करोनाग्रस्तांची संख्या तीव्र गतीने वाढत असून मृतांच्या आकड्यात वाढ होत आहे. तर, दुसरीकडे करोनाची लागण झालेले रुग्ण बरेही होत आहेत. लॉकडाऊनच्या आजच्या १० दिवशी देशभरातील स्थिती काय आहे, हे जाणून घेऊया लाइव्ह अपडेट्सच्या माध्यमातून…

Live अपडेट्स…

>> देशभरात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढली. देशात एकूण रुग्ण २३०१. यांपैकी १५६ रुग्ण झाले बरे…. तर, एकूण ५६ जणांचा मृत्यू- इंडियन मेडिकल काउंसिल ऑफ इंडियाची माहिती.

>> राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधला सर्व राज्यांमधील राज्यपालांशी संवाद.

>> यूपीत लॉकडाऊनदरम्यान पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करणार- उत्तर प्रदेश सरकारचा निर्णय.

>> या कार्यक्रमासाठी कुणीही घराबाहेर पडू नये, सोशल डिस्टंंसिंगचे पालन करावे- मोदींचे आवाहन.

>> ५ एप्रिलला रविवारी रात्री ९ वाजता प्रकाशाची महाशक्ती दिसेल- मोदी

>> रविवारी ५ एप्रिलला रात्री ९ वाजता फक्त ९ मिनिटांसाठी घरातील सर्व दिवे मालवून गॅलरीत उभे राहून मेणबत्ती, दिवे मोबाईलची फ्लॅश लाइट लावून उभे राहा- मोदी

>> येत्या ५ एप्रिलला १३० कोटी जनतेच्या महाशक्तीचे जागरण करायचे आहे- मोदी

>> आपण घरात असलो तरी एकटे नाही आहोत- मोदी

>> जनतेने दाखवलेली शक्ती भव्य आणि दिव्य अशी आहे- पंतप्रधान मोदी.

>> पाहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी याचा व्हिडिओ संदेश-

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी थोडयाच वेळात देणार व्हिडिओ संदेश.

>> राजस्थानमधील करोनाग्रस्तांची संख्या झाली १४०. बीकानेरमध्ये आढळले २ नवे रुग्ण.. दोघेही तबलीघी जमातीचे आहेत.

>> आग्र्याहून २८ लोक तबलीघी जमातीच्या मरकझमध्ये सहभागी झाले होते. यां पैकी ६ जणांना करोनाची लागण झाली आहे. आग्र्यात एकूण करोनाचे १८ रुग्ण. यांंपैकी ८ बरे झाले- प्रभु सिंह, जिल्हाधिकारी.

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात प्रसिद्ध करणार व्हिडिओ संदेश.

>> मुंबईतील धारावी येथे आणखी एक करोनाचा रुग्ण आढळला. ३५ वर्षीय डॉक्टरला करोनाची लागण. त्याच्या कुटुंबीयांना केले क्वारंटीन. धारावीतील हा तिसरा रुग्ण.

>> राजस्थानात करोनाग्रस्तांची संख्या १३८ वर. टोंक येथे आढळले ५ नवे रुग्ण. हे सर्व तबलीघी जमातीच्या निझामुद्दीनच्या मरकझमध्ये सहभागी झालेल्यांना भेटले होते. या १३८ पैकी २ इटलीचे नागरिक आहेत.

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ९ वाजता एका व्हिडिओद्वारे जनतेशी साधतील संवाद. पंतप्रधान काय बोलतील याची उत्सुकता.

>> दिल्लीत करोनाने पकडला वेग, २४ तासांमध्ये करोनाचे १४१ रुग्ण आढळले. दिल्लीत करोनाग्रस्तांची एकूण संख्या २९३ वर.

>> तेलंगणमध्ये रात्री उशिरापर्यंत २७ नवे रुग्ण आढळले, राज्यातील एकूण करोनाग्रस्तांची संख्या १५४ वर.

>> तबलीघी जमातीवर केंद्रीय गृह मंत्रालयाची कारवाई, जमातीच्या ९६० परदेशी सदस्यांच्या व्हिसा रद्द, तब्बल ९००० तबलीघी क्वारंटीनमध्ये.

>> लॉकडाऊनच्या अंमलबजावणीची पद्धत चुकली, ही काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची दुर्दैवी आणि चुकीची- केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर.

>> देशभरातील हज हाऊसना क्वारंटीन सेंटर्समध्ये बदलण्यात आले आहे- केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांची माहिती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here