संजय राऊतांचे गंभीर आरोप
पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाइंडशी किरीट सोमय्या यांचे संबंध असून त्यांचा पुत्र नील हा या मास्टरमाइंडच्या कंपनीत संचालक पदावर काम करत आहे. त्यांनी निकॉन फेज वन आणि टू असे हजारो कोटींचे प्रकल्प उभे केले आहेत. हा सगळा पीएमसी बँकेतील पैसा आहे. त्यांना पर्यावरणाच्या परवानग्या मिळालेल्या नसून राष्ट्रीय हरित लवादाने अॅक्शन घेतल्यास कारवाई होईल, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.
आदित्य ठाकरे यांनी (aaditya thackeray) या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून नील सोमय्या आणि किरीट सोमय्या यांना अटक करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. इतकेच नाही, तर पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाइंडच्या अकाऊंटमधून भारतीय जनता पक्षाला २० कोटी रुपयांचा निधी गेला असा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
सोमय्या पिता-पुत्रांवर आरोप करताना राऊत म्हणाले की ईडील्यांनी हे ऐकावे, सीबीआयवाल्यांनीही हे ऐकावे. सगळ्यांनीच मी काय म्हणतो ते ऐका. किरीट सोमय्या ही एक फ्रॉड व्यक्ती आहे. त्यांनी बँक घोटाळा करत लोकांचे पैसे बुडवले आहेत. मात्र, तर असे विचारतो की, निकॉन इन्फ्रा कंन्स्ट्रक्शन कंपनी ही कोणाची आहे?… ही कंपनी किरीट सोमय्यांची आहे, ही कंपनी नील सोमय्यांची आहे, असे सांगतानाच नील सोमय्या हे राकेश वाधवानचा पार्टनर आहे, असा दावाही राऊत यांनी केला.