औरंगाबाद : औरंगाबाद कचरा संकलन व प्रक्रियेसाठीच्या ग्राहक शुल्कात (उपभोक्ता शुल्क) महापालिकेने तिपटीने वाढ केली आहे. त्याची वसुली नवीन आर्थिक वर्षापासून होणार आहे. मालमत्ता कराच्या मागणीचिठ्ठीत त्याचा समावेश असेल. त्यामुळे मालमत्ता कर भरताना नागरिकांना उपभोक्ता शुल्क भरावेच लागेल.
मालमत्तार शुल्क (रुपये) निवासी – ३५६
व्यावसायिक – ७३०
हॉटेल्स, रेस्टॉरंट, बीअर बार – ३६५०
लॉजिंग बोर्डिंग, मोठे हॉटेल- ७३००