पुणे : शहरातील विविध भागात दुचाकीवरून येत नागरिकांचे मोबाईल हिसकावणाऱ्या पाच जणांच्या टोळीला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. तसंच त्यांच्याकडून १५ लाख रूपये किंमतीचे चोरीचे महागडे ७० मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. मोबाईल चोरल्यानंतर कुरिअरने हे मोबाईल मुंबईला पाठवून त्या ठिकाणाहून गुजरात व कोलकता परिसरात ते पाठवले जात असल्याची माहितीही समोर आली आहे. (Pune Crime Latest Update)

अनिकेत लक्ष्मण कांबळे (वय २०), विकास वाघेरे (वय २२, रा. येरवडा), एलिसन विल्सन पिल्ले (वय १९, घोरपडी गाव), तेजस गुलाब बाटे (वय २७, रा. किरकिटवाडी, सिंहगड रोड), निखील रामा पुजारी (वय २८, रा. घोरपडी गाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, शिवा लक्ष्मण पुजारी (रा. हडपसर) याला वैद्यकीय कारणासाठी अद्याप अटक केलेली नाही. आरोपी हे सकाळी व संध्याकाळी दुचाकीवरून फिरून नागरिकांना हेरून महागडे मोबाईल हिसकवत होते. यापैकी अनिकेत व वाघेरे हे मोबाईल हिसकवण्याचे काम करायचे. तर, निखिल व शिवा ते विक्री करण्याचे काम करत होते, अशी माहिती पोलीस झोन दोनचे पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भाजप खासदाराकडून अण्णा हजारेंवरील टीकेला प्रत्युत्तर; संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल

शहरात दुचाकीवरून नागरिकांचे मोबाईल हिसकावण्याच्या घटना वाढल्या होत्या. पुणे स्टेशन परिसरात मोबाईल हिसकवण्याच्या घटना घडल्यानंतर उपायुक्त सागर पाटील यांनी आरोपींना पकडण्याच्या सूचना केल्या. तसंच, बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रताप मानकर व तपास पथकाचे प्रमुख राहुल पवार यांनी तीन पथके तयार करून परिसरातील ५० पेक्षा जास्त सीसीटीव्ही तापसले. त्यावेळी एका ठिकाणी विकास वाघेरे आणि अनिकेत कांबळे दिसून आले. त्यानंतर त्यांचा शोध घेऊन ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांनी गुन्हा केल्याची कबूली दिली. त्यांनी साथीदार एलिसन, तेजस व निखिल यांच्या साथीने शहरातील विविध भागात मोबाईल चोरल्याचे सांगितले.

दरम्यान, या तिघांनाही ताब्यात घेत चौकशी केली. त्यावेळी त्यांनी गुन्हे केल्याचं कबुल केले. तसंच, चोरीचे मोबाईल शिवा पुजारी याच्यामार्फत इतर राज्यात व मुंबईला पाठवण्यात येत होते. पाच जणांना अटक करून त्यांच्याकडून आतापर्यंत १७ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. इतर तक्रारदारांचा शोध सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here