जळगाव : चोरीच्या उद्देशाने शेडमध्ये घुसून तेथे झोपलेल्या ४ वर्षीय चिमुकलीला उचलून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली होती. याप्रकरणी आता राणासिंग प्रकाशसिंग जुन्नी (वय-२२, रा.जळगाव ) या नराधमाला जळगाव जिल्हा न्यायालयाने २० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली असून ७५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. तसंच दंडातील ७० हजार रुपये हे पीडितेला देण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहे. न्या. एस. जी. ठुबे यांच्या न्यायालयाने मंगळवारी हा निकाल दिला आहे. (Jalgaon Rape Case)

जळगाव शहरातील एका भागात आपल्या पालकांसह चिमुकली शेडमध्ये वास्तव्याला होती. १७ ऑक्टोबर २०१८ रोजी मध्यरात्री शेडमध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने आरोपी राणासिंग जुन्नी याने घुसण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्याने शेडच्या दरवाजाची आतील कडी हाताने उघडून शेडमधील मोबाईल चोरले. तसंच याठिकाणी झोपलेली ४ वर्षाच्या चिमुकलीला उचलून नेत, एका निर्जळ ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार केला.

Deep Sidhu धक्कादायक बातमी: अभिनेता दीप सिद्धू याचा भीषण अपघातात मृत्यू; त्या आंदोलनामुळे आला होता चर्चेत

याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन १८ ऑक्टोंबर २०१८ रोजी तालुका पोलीस ठाण्यात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येऊन संशयित राणासिंग जुन्नी याला त्याच दिवशी अटक करण्यात आली होती.

जिल्हा न्यायालयाचे न्या. एस.जी.ठुबे यांच्या न्यायालयात हा खटला चालला. यात सरकारपक्षातर्फे १४ साक्षीदार तपासण्यात आले. पीडितेसह तिचे वडील, पंच साक्षीदार, तपासी अंमलदार, डॉक्टर यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. मंगळवारी या खटल्याच्या निकालावर कामकाज झाले. न्या. ठुबे यांनी आरोपी राणासिंग जुन्नी याला दोषी ठरवत भादवि कलम ४६१,३८० आणि बाललैंगिक अधिनियम २०१२ चे कलम ४ ब नुसार दोषी धरुन नराधामास २० वर्ष सश्रम कारावास व ७५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास अडीच वर्षाच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसंच भादंवि कलम ४६१ साठी १ वर्षाची साधी शिक्षा व ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने साधी कारवासाची शिक्षा, भादंवि कलम ३८० नुसार ३ वर्षाची साधी शिक्षा व ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने साधी कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here