मलिक यांनी मोदींच्या आवाहनाच्या अनुषंगानं एक ट्विट केलं आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलेल्या भाषणानं देशवासीयांची निराशा केली आहे. आम्हाला वाटलं होतं पंतप्रधान चुली पेटवण्याचा संदेश देतील पण साहेब दिवे जाळण्याचा उपदेश देऊन गेले,’ अशी खोचक टीका मलिक यांनी केली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री यांनीही मोदींच्या आवाहनावर जोरदार टीका केली आहे. ‘थाळी-टाळीनंतर आता दिवे जाळण्याचा कार्यक्रम सादर होत आहे. देशाला इव्हेंटची नव्हे तर रुग्णालयं, व्हेंटिलेटर आणि वैद्यकीय चाचणी प्रयोगशाळांची गरज आहे. हातावर पोट असलेले मजूर व कामगारांना दोन वेळचं जेवण हवं आहे. त्यामुळं मोदींनी हे प्रसिद्धीचे स्टंट बंद करून काहीतरी ठोस पावलं उचलावीत,’ अशी अपेक्षा थोरात यांनी व्यक्त केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी मोदींना खोचक टोला हाणला आहे. ‘म्हणे… अंधार करा आणि बॅटरी पेटवा. देशाला इतकेही मुर्खात काढू नका,’ असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times