सदर बालकाची विचारपूस केल्यानंतर आपल्या इतर चार साथीदारांच्या मदतीने पानबारा येथील आश्रमशाळेतून लॅपटॉप चोरीची कबुली त्याने दिली. यानंतर या सर्व ५ विधीसंघर्षग्रस्त बालकांकडून २१ लॅपटॉप जप्त करण्यात आले, तर एक लॅपटॉप हा धवल प्रजापत नामक इसमाला आठ हजार रुपयांना विकण्यात आला होता. चोरीचा लॅपटॉप विकत घेतल्याप्रकरणी या पाच विधीसंघर्षग्रस्त बालकांसमवेत लॅपटॉप विकत घेणाऱ्या प्रजापत यास अटक करण्यात आली आहे.
आश्रमशाळेतून २२ लॅपटॉप चोरीला गेले; पोलीस तपासातील माहितीनंतर उडाली खळबळ! – 22 laptops were stolen from the ashram school latest updates
नंदुरबार : पानबारा येथील शासकीय आश्रमशाळेतून २२ लॅपटॉप चोरीला गेल्याची माहिती समोर आली होती. या गुन्ह्याचा पोलिसांनी अवघ्या तीन दिवसात छडा लावला आहे. पाच विधीसंघर्षग्रस्त बालकांनी फक्त मौजमजेसाठी सदरची चोरी केली असून चोरीचा एक लॅपटॉप खरेदी करणाऱ्या व्यक्तीला देखील अटक करण्यात आली आहे. (Nandurbar Crime)