लोकांच्या घरापर्यंत त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत जाणे हे अतिशय क्लेशदायक असल्याची प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. राजकारणात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जातात.

सध्या देशात आणि राज्यात जे राजकारण सुरु आहे त्याचा स्तर अतिशय खालच्या पातळीवर गेला आहे.
हायलाइट्स:
- आता राजकारणाचा स्तर अतिशय खालच्या दर्जाचा
- आरोप प्रत्यारोप करणाऱ्यांनी थोडा विचार करावा
”आदित्य ठाकरेंना आवाहन करतोय, सोमय्या पिता-पुत्रांना तुरुंगात टाका”
सध्या देशात आणि राज्यात जे राजकारण सुरु आहे त्याचा स्तर अतिशय खालच्या पातळीवर गेला असल्याची टीका नांदगावकर यांनी केली. गेल्या ३० ते ४० वर्षांपासून आपण स्वतः राजकारणात असून आम्ही पण एवढी वर्ष राजकारण केलं, पण आता जो राजकारणाचा स्तर आहे तो अतिशय खालच्या दर्जावर आला आहे. या राजकारणात लोकांच्या घरापर्यंत त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत जाणे हे काय राजकारणात दिसायला चांगले नसून अतिशय क्लेशदायक असल्याची प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. राजकारणात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जातात. परंतु कोणाच्या कुटुंबापर्यंत किंवा घरापर्यंत जाऊन एवढ्या खालच्या पातळीवर राजकारण केलं जातंय. तेही पुरोगामी महाराष्ट्रात हे मला पटत नाही. आरोप प्रत्यारोप करणाऱ्यांनी थोडा विचार केला पाहिजे की राजकारणात सगळ्यांचीच घरे काचेची असतात हे ध्यानात ठेवलं पाहिजे, असा सल्ला बाळा नांदगावकर यांनी दिला.
”त्या’ धमकीनंतर पवार कुटुंबीयांच्या घरावर धाडी पडायला लागल्या’
केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून सध्याच राजकारण खेळलं जात असल्याचा आरोप एकीकडे होत असताना दुसरीकडे मात्र ‘ज्याच्या हाती ससा तो पारधी’ असे सांगत नांदगावकर यांनी, कॉंग्रेसने देखील त्यांच्या काळात केंद्रीय तपास यंत्रणांचा तसाच वापर केला होता. मात्र, कॉंग्रेसच्या काळात तो दिसत नव्हता, आता या सरकारच्या काळात दिसतोय. त्याला आपण काय करणार? असा टोला नांदगावकर यांनी लगावला.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Marathi News from Maharashtra Times, TIL Network