मुंबई: कालपर्यंत महाविकासआघाडीत एकाकी पडल्याची चर्चा असलेले खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवनातून जोरदार शक्तीप्रदर्शन करत पक्ष आपल्या पाठिशी असल्याचे दाखवून दिले. त्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आता किरीट सोमय्या हेच या लढाईत एकटे पडल्याचे सूचित करण्याचा प्रयत्न केला आहे. संजय राऊत यांनी बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना एक सूचक वक्तव्य केले. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे कोण आहेत, असा सवाल राऊत यांनी यावेळी उपस्थित केला. किरीट सोमय्या हे काही तपास अधिकारी नाहीत. प्रथम भाजपने किरीट सोमय्या हा त्यांचा जबाबदार माणूस आहे का, हे सांगावं. मी शिवसेनेतील जबाबदारी व्यक्ती म्हणून बोलत आहे. किरीट सोमय्या करत असलेल्या आरोपांना भाजप नेत्यांचा पाठिंबा आहे का, हे सर्वप्रथम स्पष्ट करावे, असे संजय राऊत यांनी म्हटले. त्यामुळे आता भाजपचे प्रमुख नेते यावर काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. किरीट सोमय्या यांनी बुधवारी सकाळी दिल्लीत पत्रकारपरिषद घेऊन संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. मात्र, यावेळी ते एकटेच होते. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. (Shivsena MP Sanjay Raut slams Kirit Somaiya)
किरीट सोमय्या यांनी बिल्डरला ‘ईडी’ची धमकी देऊन १०० कोटींचा प्लॉट लाटला; अधिकाऱ्याला १५ कोटी दिले: राऊत
संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर बुधवारी अनेक नवे आरोप केले. किरीट सोमय्या यांच्या पत्रकारपरिषदेवरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. मी काल किरीट सोमय्या यांना अलिबागमध्ये रश्मी ठाकरे यांचे १९ बंगले कुठे आहेत, ते दाखवावे, असा प्रश्न विचारला होता. पण आता सोमय्या तो मुद्दा सोडून बंगल्याचा कर कोणी भरला, या मुद्द्यावर आले आहेत. बंगले आहेत किंवा नाहीत, हे मला सांगा. कागद वगैरे मला दाखवू नका. १९ बंगले म्हणतात ते कुठे आहेत, ते दाखवा. देवस्थानाच्या जमिनी कुठे आहेत? संजय राऊत यांची बेनामी मालमत्ता कुठे आहेत, हे माझे प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरे किरीट सोमय्या यांनी दिलीच नाहीत. लवकरच ते जेलमध्ये जातील, असे संजय राऊत यांनी म्हटले.
”त्या’ १९ बंगल्यांबद्दल उद्धव आणि रश्मी ठाकरे का बोलत नाहीत?’, सोमय्यांचा हल्लाबोल
अमोल काळे हा कोण आहे, याचा खुलासा भाजपने करावा. अन्यथा आम्ही त्याला समोर आणू, असेही संजय राऊत यांनी म्हटले. या सगळ्याची सुरुवात तुम्ही केलेय, आम्ही नव्हे. पण या सगळ्याचा शेवट आम्हीच करू, असेही संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.

‘साडेतीन व्यक्तींचा उलगडा हळूहळू होईल’

संजय राऊत यांनी भाजपमधील साडेतीन लोक तुरुंगात जातील, असे म्हटले होते. परंतु, कालच्या पत्रकारपरिषदेत संजय राऊत यांनी त्याचा खुलासा केला नव्हता. या साडेतीन व्यक्ती जेलमध्ये जातील, तसतसा सगळ्याचा खुलासा होईल, असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here