मुंबई: करोना विषाणूविरोधातील (coronavirus) लढ्यातील योद्धे अर्थात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाइन वर्कर्सचे पहिल्यांदाच मुंबई महापालिकेकडून (BMC) सीरो सर्व्हे करण्यात येणार आहे. हा सहावा सीरो सर्व्हे तीन टप्प्यांत होणार आहे. यात तीन हजार आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाइन वर्करचा समावेश असेल. त्यांच्यात तयार झालेल्या अँटिबॉडीजचे प्रमाण जाणून घेण्यासाठी आणि त्यांना बुस्टर डोस (Booster Dose) ची आवश्यकता आहे किंवा नाही, हे निश्चित करण्यासाठी सीरो सर्व्हे करण्यात येणार आहे. त्यासाठी मार्चमध्ये त्यांने नमुने घेण्यात येणार आहेत.

लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मुंबई महापालिकेकडून सीरो सर्व्हे करण्यात येणार होता. मात्र, मुंबईत करोनाची तिसरी लाट आल्यानंतर सीरो सर्व्हे होऊ शकला नाही. आता तिसरी लाट हळूहळू ओसरत आहे. करोनाचा प्रादूर्भाव कमी होऊ लागला आहे. त्यामुळे महापालिकेने आता पुन्हा सीरो सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला आहे. पण तो केवळ आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाइन वर्कर्ससाठी असणार आहे. मार्चमध्ये त्यांचे नमुने गोळा करण्यात येणार आहेत. त्यानंतर तीन महिन्यांनी पुन्हा तीन हजार आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाइन वर्कर्सचे नमुने घेतले जाणार आहेत. त्यानंतर महापालिका प्रशासन पुन्हा सहा महिन्यांच्या अंतराने त्यांचे नमुने घेणार आहे, असे सांगण्यात येत आहे.

पालिकेकडून निवासी डॉक्टरांना १ लाख २५ हजार रुपयांचे बक्षीस
कोविडयोद्ध्या परिचारिकांचा महापालिकेकडून सन्मान

आरोग्य कर्मचाऱ्यांचे नमुने हे रुग्णालयांतून आणि २४ वॉर्डमधून फ्रंट लाइन वर्कर्सचे नमुने घेतले जाणार आहेत. सर्वप्रथम गोळा केलेले नमुने सीरो सर्व्हेचा अहवाल महिनाभराच्या आत येतील. हर्ड इम्युनिटी जाणून घेण्याऐवजी ब्रेक-थ्रू इन्फेक्शनच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न या सीरो सर्व्हेतून केला जाणार आहे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, मुंबईत लसीकरणानंतरही ब्रेक थ्रू इन्फेक्शनचे प्रमाण वेगाने वाढत आहे. गेल्या वर्षभरात करोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेणाऱ्या ८७ लाखांहून अधिक नागरिकांपैकी १.८९ टक्के म्हणजेच, दीड लाखांहून अधिक नागरिकांना करोनाचा संसर्ग झाला आहे. तर पहिली मात्रा घेणाऱ्या एक कोटीहून अधिक नागरिकांपैकी २३ हजारांहून अधिक नागरिकांना करोनाचा संसर्ग झालेला आहे. करोनाबाधितांमध्ये तरूणांची संख्या सर्वाधिक आहे. मागील वर्षभरात दोन्ही मात्रा घेणाऱ्या तरूणांपैकी ८० हजारांहून अधिक तरूणांना करोनाचा संसर्ग झाला आहे.

coronavirus update: करोना: राज्यात आज २ हजारांवर नवे रुग्ण; तर, ३५ रुग्णांचा मृत्यू
कर्मचाऱ्यांच्या संपामुळं एसटी ठप्प; आता प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here