म. टा. वृत्तसेवा,

मोखाडा तालुक्यातील कोशिमशेत गावात एका १६ महिन्यांच्या मुलाला एमआर व दिल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. (१६ महिने) याला १० फेब्रुवारी रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, वाशाळा येथील परिचारिकेने घरी जाऊन एमआर व ट्रिपल बूस्टर लसमात्रा दिली होती. सर्वेशला ९ तारखेला १६ महिने पूर्ण झाले असल्याने उशिराने डोस देण्याची विनंती केल्यानंतरही नर्सने दोन्ही दोन लशी एकत्र दिल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.

ही लसमात्रा दिल्यानंतर थोड्या वेळातच सर्वेशला ताप आला. नर्सने दिलेले औषध त्याला दिल्यानंतरही बरे न वाटल्याने १२ तारखेला कुटुंबियांनी त्याला खोडाळा येथील खासगी दवाखान्यात नेले. परंतु ताप खूप असल्याने आणि बाळाला आकडी येत असल्याने खासगी दवाखान्याच्या डॉक्टरांनी त्याला मोखाड्याच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी लगेच मोखाड्याच्या ग्रामीण रुग्णालयात बालकाला दाखल केले. पण उपचारांआधीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

‘वय १६ ते २४ महिने असलेल्या बाळांना बुस्टर मात्रा देतात. या बाळाला १६ महिने पूर्ण झाले होते. त्यामुळे नर्सने दोन्ही मात्रा दिल्या होत्या. बाळाचे शवविच्छेदन झाले आहे. त्याचा अहवाल १५ दिवसांत मिळेल. दोषींवर कारवाई केली जाईल.

– भाऊसाहेब चत्तर, तालुका आरोग्य अधिकारी, मोखाडा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here