नागपूर : नागपूर आणि औरंगाबाद या दोन महत्त्वपूर्ण शहरांना जोडणारी ‘नागपूर-औरंगाबाद-पुणे’ विमानसेवा येत्या मार्च महिन्यात सुरू होणार आहे. या दोन्ही शहरांत होणारी दररोजची ये-जा मोठ्या प्रमाणावर आहे. परिणामत: ही विमानसेवा यशस्वी ठरण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

विदर्भ आणि मराठवाडा या दोन प्रदेशातील महत्त्वाची आर्थिक केंद्रे म्हणून नागपूर आणि औरंगाबादकडे बघितले जाते. या दोन्ही शहरांदरम्यान होणारे दैनंदिन आवागमन लक्षणीय आहे. प्रामुख्याने नागपूरहून औरंगाबाद वा औरंगाबादहून नागपूरला येण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्सचा उपयोग करण्यात येतो. या प्रवासात किमान १२ तासांचा कालावधी लागतो. त्याशिवाय एसटी बसनेदेखील प्रवासी जातात. त्यांना १२ ते १३ तासांचा प्रवास करावा लागतो. नागपूरहून औरंगाबादसाठी थेट रेल्वेसेवा नाही. ज्या काही थोड्या रेल्वे औरंगाबाद येथे थांबतात, त्याने प्रवास करणे अधिक कठीण आणि वेळखाऊ आहे. त्यामध्ये खासगी ट्रॅव्हल्सपेक्षाही अधिक वेळ जातो. त्यामुळे बहुतांश प्रवासी खासगी ट्रॅव्हल्स बसने रात्रीच्या वेळी प्रवास करतात. ही समस्या आता विमानसेवेमुळे दूर होणार आहे. अवघ्या दीड तासांच्या आत हा प्रवास पूर्ण होणार असल्याने प्रवासी सुखावले आहेत. मुख्य म्हणजे नागपूर-औरंगाबाद-पुणे अशी ही विमानसेवा राहणार आहे. ही सेवा केवळ नागपूर-औरंगाबादपुरती मर्यादित नसल्याने महसुलाच्या दृष्टिकोनातून अधिक फायदेशीर ठरणार आहे.

भाजप आमदाराच्या भावाने फोनवरून दिली जीवे मारण्याची धमकी; पोलिसात गुन्हा दाखल

शुक्रवारपासून ‘चलो शिर्डी’

पुणे-शिर्डी-नागपूर अशी आठवड्यातील सर्व दिवस विमानसेवा शुक्रवार, १८ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. एअर इंडिया ही सेवा संचालित करणार आहे. सुरुवातीला ७० आसनक्षमता असलेले विमान वापरण्यात येणार आहे. विमानाला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेत अधिक आसनक्षमतेचे विमान सुरू करण्यात येईल, अशी माहिती आहे. विदर्भातील साईभक्तांची मोठी संख्या पाहता ही विमानसेवा यशस्वी ठरण्याची अपेक्षा आहे.

धक्कादायक! भंगाराच्या दुकानात असं काही सापडलं की नागपूर प्रशासन हादरलं, पोलीसही हैराण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here