नागपूर : राज्यभरात गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या वेगानं वाढ होत आहे. कुठे लूटमार कुठे खून तर कुठे आणखी हिंसाचाराच्या घटना समोर आल्याचं आपल्याला रोज पाहायला मिळतं. पण आता आपल्या स्वतःच्या घरातही राहणं सुरक्षित नाहीये. कारण, नागपूरमध्ये यासंबंधी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नागपूरमध्ये घरात घुसून पत्नीचा विनयभंग केला, इतकंच नाहीतर पतीवरही चाकूने गंभीर वार केल्याची घटना समोर आली. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

नागपूर-औरंगाबाद-पुण्यातून आता आकाशी झेप, नागरिकांसाठी आनंदाची बातमी
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री जरिपटका परिसरात हा प्रकार घडला. एका तरूण युवकानं हा प्राणघातक हल्ला केला. शुभम जुगनू शिर्के असं २१ वर्षीय तरुणाचं नाव असून पोलिसांनी त्याच्या विरोधात विनयभंगाचा आणि प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, पती-पत्नी हे घरात असताना शुभम अचानक त्यांच्या घरात घुसला, पतीवर गंभीर वार केले आणि पत्नीचा विनयभंग केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे, सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे गुन्हा करणारा हा युवक अवघ्या २१ वर्षांचा आहे. त्यामुळे आताची तरुणाई कुठल्या मानसिकतेमध्ये वाढत आहे आणि त्यांच्यावर काय संस्कार होत आहेत ही सर्वच पालकांच्या चिंतेची बाब आहे.

भाजप आमदाराच्या भावाने फोनवरून दिली जीवे मारण्याची धमकी; पोलिसात गुन्हा दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here