यवतमाळ : एसटी महामंडळाच्या शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी मागील तीन महिन्यांपासून संप सुरू केला आहे. यात सहभागी झालेल्या काही कर्मचाऱ्यावर विविध प्रकारची कारवाई करण्यात आली. यामध्ये ३९ महिला कर्मचाऱ्यांच्या समावेश आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सर्व ९ही आगार आणि आस्थापना विभागातील एकूण ३९ महिला कर्मचारी कारवाईत अडकल्या आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबन, बडतर्फ, सेवा समाप्ती, बदली आदी प्रकारच्या कारवाईसह काही कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यवतमाळ विभागात एकूण ३५० महिला कर्मचारी आहे. यामध्ये सर्वाधिक २४३ वाहक आहे. प्रामुख्याने संपात चालक आणि वाहकांना समावेश आहे. त्यामुळे कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये सर्वाधिक चालक वाहक आहेत. महिला वाहक कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हीच परिस्थिती आहे.

वासनेचा कळस! २१ वर्षीय तरुणाचं पती-पत्नीसोबत भयंकर कृत्य, घरात घुसला अन्…
विभागात महिला वाहकानंतर प्रशासनातील कर्मचारी संख्या ६९ आहेत. त्यापैकी काही महिला कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. यांत्रिक विभागात ३३ महिला कर्मचारी आहे. पाच महिला अधिकारी आहे. कर्मचारी कामावर यावे यासाठी महामंडळाकडून अनेकदा संधी देण्यात आली. परंतु, कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

नागपूर-औरंगाबाद-पुण्यातून आता आकाशी झेप, नागरिकांसाठी आनंदाची बातमी

एसटीचे १४४२ कर्मचारी संपात…

यवतमाळ विभागातील १४४२ कर्मचारी संपात संपात सहभागी झाले आहेत. या विभागात एकूण २०७० कर्मचारी आहेत यामध्ये सर्वाधिक चालक ७७७ तर ६०३ आहे. शिवाय प्रशासकीय विभागातील ३५५ आणि कार्यशाळेतील ३३५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. संपामध्ये प्रशासकीय विभागातील ५० कार्यशाळेतील २२६, चालक ५६९ तर ५०७ वाहक सहभागी आहेत.

धक्कादायक! भंगाराच्या दुकानात असं काही सापडलं की नागपूर प्रशासन हादरलं, पोलीसही हैराण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here