म. टा. वृत्तसेवा, ठाणे ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. पक्षबळ वाढविण्यासाठी तसेच प्रभागातील पक्षाचे वर्चस्व वाढवत एकहाती सत्ता मिळविण्यासाठी फोडाफाडीचे राजकारण सुरू झाले आहे. दिव्यातील भाजपचे आदेश भगत यांच्यापाठोपाठ आता दिवा शहर अध्यक्ष नीलेश पाटील यांनीही शिवसेनेत प्रवेश करत शिवबंधन बांधून घेतले आहे. यामुळे दिव्यात भाजपला मोठा धक्का असल्याचे मानले जात

आहे. महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपली ताकद वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या भागांतून पक्षाचे कार्यकर्ते पक्षप्रवेश करत आहेत. शिवसेनेने कळवा आणि मुंब्र्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना प्रवेश दिल्यानंतर दिव्यातील भाजपमधील पक्षफोडीचे राजकारण चांगलेच वाढू लागले आहे.

राजकारणात सगळ्यांची घरे काचेची आहेत – बाळा नांदगावकर

‘राजकारणाचा दर्जा खालावलाय, सर्वच राजकारण्यांची घरं काचेची असतात याचं भान राहू द्या’

पंधरा दिवसांपूर्वी आनंद दिघे यांच्या जयंतीदिनी दिव्यातील तत्कालीन भाजप दिवा शीळ मंडळ अध्यक्ष तसेच दिवा रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष अॅड. आदेश भगत, अॅड सुप्रिया भगत आणि माजी परिवहन सभापती शैलेश भगत यांनी भाजपला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला. पाटील शिवसेनेचा दरवाजा ठोठावणार यांची माहिती मिळताच एक दिवस आधी भाजपचे ठाणे शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांनी नीलेश पाटील यांची दिवा मंडळ अध्यक्षपदी निवड केली होती. हा सोहळा दिव्यात चांगलाच रंगला होता. मात्र नियुक्त होऊनही पदावर समाधानी नसलेले पाटील यांनी मंगळवारी हजारो भाजपा पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

पालिका शोधणार… पाणी मुरते कुठे?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here