विठ्ठल दादा घुगे आणि सुनीता घुगे अशी मृतांची नावे असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अपघाताला कारणीभूत ठरलेला डंपरचालक घटना स्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
अपघातानंतर दत्त मंदिर चौकात दूरवर वाहनांच्या रांगा लागल्या होता. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. या दुर्घटनेनंतर परिसरात बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, अतिशय वर्दळीचा भाग असलेल्या नाशिक- पुणे महामार्गावर नेहमीच अपघात घडत असतात आणि आज झालेल्या या अपघातात एकाच कुटुंबातील दोघा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.