रिओ दि जेनेरिओ, :
ब्राझीलच्या महत्त्वाच्या शहरांपैंकी एक असलेल्या शहरात पुरामुळे भीषण परिस्थिती निर्माण झालीय. इथल्या डोंगराळ भागात झालेल्या अतिवृष्टीनंतर भूस्खलन आणि पुरात किमान १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय. मंगळवारी रात्री उशिरा संबंधित अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलीय.

भूस्खलनामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. कारण पेट्रोपोलीस क्षेत्रात येणाऱ्या बाधित भागात बचाव पथकांकडून पीडितांचा शोध सुरू आहे.

२०११ मध्येही याच भागाला पावसाचा फटका
उल्लेखनीय म्हणजे, २०११ सालीही अतिवृष्टीमुळे शेकडो जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं होतं. रिओ राज्याच्या अग्निशमन विभागानं निवेदनाद्वारे दिलेल्या माहितीत, १८० लष्करी कर्मचारी बचाव कार्यात गुंतले असल्याचं म्हटलंय. दिवसाच्या तीन तासांत या भागात २५.८ सेंटीमीटर पाऊस झाला, जो मागील ३० दिवसांच्या पावसाइतका असल्याचं विभागानं म्हटलंय.

ब्राझील राष्ट्राध्यक्ष रशियाच्या दौऱ्यावर
दरम्यान, ब्राझीलचे सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. रिओ दि जेनेरिओच्या परिस्थितीची माहिती मिळताच राष्ट्राध्यक्षांनी आपल्या मंत्र्यांना पीडितांपर्यंत तत्काळ मदत पोहचवण्याचे निर्देश दिलेत. सोशल मीडियाद्वारे जेयर बोलसोनारो यांनी ही माहिती दिलीय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here