औरंगाबाद : विवाहिता महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, लग्न करण्याचे आमिष दाखवून अत्याचार केला. यानंतर महिला गर्भवती राहिली असता हॉस्पिटलमध्ये नेऊन जबदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडणाऱ्या प्रियकरासह त्याचे वडील व हॉस्पिटलच्या डॉक्टरांविरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात २६ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. तिचे लग्न नाशिक येथे झाले होते. लग्नानंतर तिला सहा वर्षांचा मुलगाही आहे. लग्नानंतर साधारणत: चार वर्षांनी तिचा मित्र उमेर (रा. चंपा चौक, पूर्ण नाव उपलब्ध नाही) याने जाफिर शेर यार खान (वय २९, रा. रोहिला गल्ली) याच्याशी ओळख करून दिली. दोघे एकमेकांसोबत मोबाइलवरून बोलत होते. त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. ही बाब विवाहितेच्या पतीला कळाल्यानंतर त्याने महिलेशी संबंध तोडले. यानंतर महिला शहरातच राहू लागली. जाफिर याने महिलेला सांभाळ करण्याचे आमिष दाखवून तिला रशिदपुरा भागात घर घेऊन दिले.

अखेर ‘त्या’ माजी आमदार पुत्राने फडणवीसांच्या उपस्थित भाजपमध्ये केला प्रवेश
जाफिर याच्यासोबत परस्पर संमतीने राहण्यास गेल्यानंतर विवाहिता गर्भवती झाली. गर्भपात केल्याशिवाय लग्न करणार नसल्याचे त्याने सांगितले. मात्र, विवाहितेने नकार दिला. यानंतर विवाहितेला पोटात त्रास होत असल्याने जाफिर याने डीमार्ट जवळील एका हॉस्पिटलमध्ये नेले. या ठिकाणी डॉक्टरांनी गोळ्या दिल्या. जाफिर याने दुसऱ्या दिवशी महिलेला त्याच हॉस्पिटलमध्ये नेले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी पुन्हा काही गोळ्या दिल्या. या गोळ्या घेतल्यानंतर दोन तासांनी गर्भपात झाला. या प्रकरणी महिलेला जबरदस्तीने गर्भपात करायला भाग पाडणाऱ्या जाफिर खान याच्यासोबत त्याचे वडील शेर यार खान आणि संबंधित डॉक्टर यांच्या विरोधात महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्टार्टअप्स करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त दरात भूखंड मिळण्याबाबत मोठी घोषणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here