जळगाव : जिल्ह्यातील चाळीसगाव इथं चार वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचारप्रकरणी न्यायालयाने आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप सुनावली आहे. पोलिसांनी अवघ्या १७ दिवसात गुन्ह्याचा तपास पूर्ण करत दोषारोप दाखल केले. न्यायालयात जलदगतीने खटला चालवून अवघ्या ६० दिवसात सुनावणी पूर्ण करण्यात आली. न्या. एस. एन. माने-गाडेकर यांनी आज बुधवारी (दि.१६) नराधमाला आजन्म कारावास व २ लाख दंडाची शिक्षा सुनावली आहे. पीडित मुलीला मनोधैर्य योजनेंतर्गत ३ लाख रुपये यापूर्वी मदत दिली आहे. तसंच आरोपीच्या दंडापैकी ५० टक्के रक्कम आणि विक्टिम कॅम्पेनसेशन फंड अंतर्गत १० लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सावळाराम भानुदास शिंदे (वय २७, रा. लोंढरे, ता. नांदगाव, जि. नाशिक) असं शिक्षा झालेल्या आरोपीचं नाव आहे. (Jalgaon Rape Case)

चाळीसगाव तालुक्यातील पीडित मुलीचा नातेवाईक असलेला नाशिक जिल्ह्यातील रहिवासी सावळाराम शिंदे हा २७ नोव्हेंबर रोजी त्यांच्या घरी आला होता. बिस्किट देण्याच्या बहाण्याने त्याने बालिकेला बाहेर नेत तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेत दुसऱ्याच दिवशी त्याला अटक केली. पोलिसांनी १७ दिवसात तपास पूर्ण करुन १५० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.

coronavirus latest update करोना: राज्यात आज २ हजारांवर नवे रुग्ण; मृत्युसंख्येत किंचित वाढ

गुन्ह्याचा प्राथमिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी केला. पोलिसांनी आरोपी व पीडित मुलीचे कपडे व अंगावरील सॅम्पल तात्काळ प्रयोगशाळेत पाठवून डी. एन. ए. अहवाल प्राप्त करून गुन्ह्याचा तपास अवघ्या १७ दिवसात तपास पूर्ण करत दोषारोप पत्र सादर केले. जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी जिल्हा सरकारी वकील अॅड. केतन ढाके यांच्यामार्फत विशेष न्यायालयास सदर गुन्ह्याचा खटला जलदगतीने चालवण्यात यावा, अशी विनंती केली होती. यात १३ साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. ३ ते २१ जानेवारी दरम्यान आठ दिवस खटल्याचे कामकाज चालले. यात पीडित बालिकेची साक्ष महत्त्वाची ठरली. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी शिंदे याला अपहरण, अत्याचार, पोक्सोच्या सर्व कलमांखाली दोषी धरुन शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अॅड. केतन ढाके यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी विजय पाटील यांनी सहकार्य केले.

पोलीस अधीक्षकांकडून कौतुक

या गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल झाल्यापासून ६० दिवसात निकाल लागून आरोपीला शिक्षा झाल्याने पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी गुन्ह्यातील तपास अधिकारी व अंमलदार यांना रोख बक्षीस जाहीर करुन त्यांचा सत्कार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here