(उत्तर प्रदेश): कुशीनगर जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली आहे. एका हळदी समारंभासाठी मोठ्या संख्येने नातेवाईक जमले असतानाच विहिरीवरील जाळी तुटून अनेक जण त्यात कोसळले व त्यातील किमान ११ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेवर मुख्यमंत्री यांनी तीव्र शोक व्यक्त केला असून मदत आणि बचावकार्य तत्काळ सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. जखमींवर वेगवान उपचार होतील यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावे, असेही अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. ( )