वॉशिंग्टन, अमेरिका :

वैद्यकीय इतिहासात पहिल्यांदाच एका एचआयव्ही पॉझिटिव्ह महिलेनं विषाणूवर मात केलीय. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जगात पहिल्यांदाच एखाद्या महिलेवर यशस्वी उपचार पार पडले आहेत.

महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ‘स्टेमसेल ट्रान्सप्लान्ट‘द्वारे करण्यात महिलेवर आलेले उपचार यशस्वी ठरलेत.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, एचआयव्हीविरूद्ध प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तीनं हे स्टेमसेल दान केले.

कॅलिफोर्निया विद्यापीठाचे डॉ. इव्हॉन ब्रायसन आणि जॉन हॉपकिन्स विद्यापीठ, बाल्टिमोरचे डॉ. डेब्रा परसॉड यांच्या नेतृत्वाखाली या उपचाराची संपूर्ण प्रक्रिया पार पडली.

Brazil Floods: ‘रिओ दि जेनेरिओ’त पूर आणि भूस्खलनामुळे भीषण हानी, १८ जणांचा मृत्यू
गुप्तचर विभागातील भ्रष्टाचाराचं ‘स्टिंग ऑपरेशन’, पत्रकाराला बेदम मारहाण
दोन पुरुषांवर यशस्वी उपचार झाले होते

मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी दोन रुग्णांनी एचआयव्ही विषाणूवर मात केली होती. यातील पहिलं प्रकरण एका श्वेत पुरुषासंबंधी होतं, तर दुसरं दक्षिण अमेरिकेतील एका पुरुषाचं होतं. त्यानंतर, आता पहिल्यांदाच एका महिलेनं एचआयव्हीवर मात केल्याचंही दिसून आलंय.

अशी पार पडली उपचाराची प्रक्रिया

डॉक्टरांच्या टीमनं प्रथम बाधित रुग्णाच्या कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी ‘केमोथेरपी’चा वापर केला. त्यानंतर जनुकीय उत्परिवर्तन झालेल्या व्यक्तीच्या स्टेमसेलचे रुग्णात प्रत्यारोपण करण्यात आले.

प्रत्यारोपणाच्या रुग्णांमध्ये एचआयव्हीची प्रतिकारशक्ती विकसित होऊ शकते, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केलाय.

Indian Embassy Ukraine: युक्रेन संकटादरम्यान भारतीय दूतावासाकडून महत्त्वाची सूचना जारी
Canada Impose Emergency: कॅनडात ५० वर्षांत दुसऱ्यांदा आणीबाणी, ट्रक चालकांचा संप संपुष्टात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here