अलिबागच्या कोर्लई गावात रश्मी ठाकरे यांच्या मालकीचे १९ बंगले असल्याची कागदोपत्री नोंद असल्याचा दावा किरीट सोमय्या यांच्याकडून सातत्याने केला जात आहे. या १९ बंगल्यांसाठी रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी आठ वर्षे मालमत्ता कर भरल्याची नोंद ग्रामपंचायतीमध्ये आहे.

 

Rashmi Thackery kirit Somaiya

अलिबागच्या कोर्लई गावात रश्मी ठाकरे यांच्या मालकीचे १९ बंगले असल्याची कागदोपत्री नोंद असल्याचा दावा किरीट सोमय्या यांच्याकडून सातत्याने केला जात आहे.

हायलाइट्स:

  • शुक्रवारी कोर्लई गावात जाऊन संबधित जागेची पाहणी करणार
  • रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी आठ वर्षे मालमत्ता कर भरल्याची नोंद ग्रामपंचायतीमध्ये
मुंबई: केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी होण्याच्या शक्यतेमुळे खासदार संजय राऊत प्रचंड तणावाखाली आले आहेत. त्यांना शिवसेनेकडून हवी तशी मदत मिळत नाही. त्यामुळेच संजय राऊत आता रश्मी ठाकरे आणि त्यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांना वादात ओढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला. अलिबागच्या कोर्लई गावात रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या मालकीचे १९ बंगले असल्याची कागदोपत्री नोंद असल्याचा दावा किरीट सोमय्या यांच्याकडून सातत्याने केला जात आहे. या १९ बंगल्यांसाठी रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी आठ वर्षे मालमत्ता कर भरल्याची नोंद ग्रामपंचायतीमध्ये आहे. ही जमीन रश्मी ठाकरे यांच्या नावावर करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या बैठकीत रितसर ठराव मंजूर झाला होता. त्या बैठकीची मिनिटस (इतिवृत्त) माझ्याकडे आहेत. परंतु, आता कोर्लई गावात १९ बंगले नसल्याची तक्रार समोर येत आहे. मग रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर नक्की कशासाठी मालमत्ता कर भरत होत्या? त्यामुळे आता मी शुक्रवारी कोर्लई गावात जाऊन संबधित जागेची पाहणी करणार आहे. त्यानंतर आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे १९ बंगले चोरीला गेले, अशी तक्रार दाखल करणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले. ते गुरुवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. (BJP leader Kirit Somaiya slams Shivsena MP Sanjay Raut)
किरीट सोमय्यांसाठी तुम्ही मध्ये पडू नका; अन्यथा लोक तुमचीही धिंड काढतील; राऊतांचा भाजप नेत्यांना इशारा
यावेळी किरीट सोमय्या यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्यावर केलेले हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराचे सर्व आरोप फेटाळून लावले. संजय राऊत माझ्यावर आरोप करण्यासाठी माध्यमांचा गैरवापर करत आहेत. त्यामुळे यापुढे संजय राऊत यांनी कोणताही आरोप केल्यास माध्यमांनी त्यांच्याकडे कागदपत्रे मागावीत, असा सल्ला किरीट सोमय्या यांनी दिला. तसेच या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा रश्मी ठाकरे यांनी कोर्लई गावातील १९ बंगल्यांचा मालमत्ता कर भरल्याचा उल्लेख केला. १ जानेवारी २०१९ रोजी रश्मी ठाकरे यांनी कोर्लई ग्रामपंचायतीला संबंधित जमीन आपल्या नावावर करण्यासाठी पत्र लिहले. त्यानुसार ग्रामपंचायतीने ही जमीन रश्मी ठाकरे यांच्या नावावर केली. ही जमीन पूर्वी अन्वय नाईक यांच्या मालकीची होती. त्यामुळे रश्मी ठाकरे यांनी या जागेच्या मालमत्ता कराची थकबाकीही अदा केली होती. रश्मी ठाकरे या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे मला याप्रकरणावर बोलायचे नव्हते. पण संजय राऊत यांनी हा मुद्दा उपस्थित केल्याने आता मला या सगळ्यावर बोलावे लागत असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला. संजय राऊत आता स्वत: अडचणीत आहेत. त्यामुळे आता संजय राऊत ठाकरे कुटुंबीयांच्या बाबतीत ‘हम तो डुबेंगे, सनम तुमको भी ले डुबेंगे’ अशा पद्धतीने वागत असल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला.
‘पवईतील SRA प्रकल्पात बोगस लोक घुसवून सोमय्या यांचा ३०० कोटींचा भ्रष्टाचार; फडणवीसांच्या नावानेही पैसे उकळले’
कोव्हिड सेंटरचा मूळ मुद्दा बाजूलाच राहिला: किरीट सोमय्या

संजय राऊत हे जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी माझ्यावर आरोप करत आहेत. त्यामुळे कोव्हिड सेंटरच्या भ्रष्टाचाराचा मूळ मुद्दा बाजूला राहिला, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले. सुजीत पाटकर यांनी बनावट कागदपत्रे सादर करुन कोव्हिड सेंटरचे कंत्राट मिळवले. त्यांच्या आणखी काही बनावट कंपन्यांची तक्रार मी दिल्लीत जाऊन केल्याचेही किरीट सोमय्या यांनी सांगितले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : sanjay raut trying pull rashmi thackeray into matter to save himself says bjp leader kirit somaiya
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here