ठाण्यातील भिवंडीत वडपा परिसरात विचित्र अपघात झाला. या अपघातात ९ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी ५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मुंबई-नाशिक हायवेवर हा भीषण अपघात झाला.

 

भरधाव कार दुभाजकावरून विरूद्ध दिशेकडील रिक्षा, दुचाकीला धडकली; भिवंडीत विचित्र अपघातात ९ जखमी

हायलाइट्स:

  • ठाण्यातील भिवंडीत भीषण अपघात
  • कार दुभाजकावरून थेट रिक्षा आणि दुचाकीवर आदळली
  • रिक्षातील सात जण, दुचाकीवरील दोघे जण जखमी
  • जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर
ठाणे: भिवंडी येथील वडपा परिसरात कारचालकाचा ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एकूण नऊ जण जखमी झाले. त्यापैकी ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. या ९ जखमींपैकी ४ जणांना भिवंडीतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. इतर ५ जणांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आणि मुंबई शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.

भिवंडी येथील वडपा परिसरात एका कारचालकाचा ताबा सुटून भीषण अपघात झाल्याची घटना घडली. मुंबई-नाशिक हायवेवर वडपा परिसरात ही घटना घडली. सिग्नल न देताच चालकाने कंटेनर वळवला. कंटेनरच्या मागून कार येत होती. चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेकडील मार्गिकेवर गेली. भरधाव कारने रिक्षा आणि दुचाकीला जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात रिक्षामधील ७ जण आणि दुचाकीवरील २ जण असे एकूण ९ जण जखमी झाले. त्यातील ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमी झालेल्यांपैकी ४ जणांना भिवंडी येथील इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर इतर ५ जणांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि मुंबई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.

वीटभट्टीवरील भीषण अपघात, तीन मुलींचा मृत्यू

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : thane bhiwandi accident speeding car collides to auto rickshaw and bike 9 injuered
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here