जळगावात शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे महिलांची रॅली निघाली. या रॅलीला झेंडा दाखवून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सुरुवात झाली. त्यावेळी गुलाबराव पाटील पत्रकारांशी बोलत होते. किरीट सोमय्या यांना कोणतेही कार्यक्रम नसतात आणि त्यांना कोणी नातेवाईकही नाहीत. फक्त टीका करणं हाच त्यांचा धंदा आहे, असा हल्लाबोलही गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे आमच्यासाठी वर्षभरातला मोठा सण असतो. मात्र कोर्टाच्या निर्बंधांमुळे ज्या उत्साहपूर्ण वातावरणात जयंती साजरी होते त्या आनंदावर आणि उत्साहावर विरजण पडलं आहे. मात्र धोका लक्षात घेता नियम पाळणे ही तेवढंच महत्त्वाचं आहे. शिवजयंती साजरी करत असताना प्रत्येकाने करोनाच्या नियमांचं पालन करावं, असं आवाहनही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.