पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमल जयकिशन जेठाणी (वय ३७, रा. सिंध सोसायटी, औंध ) यांनी १५ फेब्रुवारी रोजी दिघी पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली होती. ही फसवणूक २०१४ ते २०२० या दरम्यान स्टार सिटी गृहप्रकल्प, डुडुळगाव येथे घडल्याचा आरोप आहे. या प्रकरणात दिघी पोलिसांनी दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तसंच सचिन थोरात यास अटक करण्यात आली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
जेठाणी यांची डुडुळगाव येथे स्टार सिटी नावाची साईट आहे. यातील ए, बी आणि सी विंगमधील फ्लॅट विक्री करण्याचे काम आरोपींना दिले होते.त्यासंदर्भात सोल सेलिंग एजंटचा करारनामा देखील करण्यात आला होता. त्यानुसार फ्लॅटच्या किमतीच्या सव्वा टक्के कमिशन आरोपींना देण्याचं ठरलं होतं. मात्र आरोपींनी संगनमत करुन बुकिंग करणाऱ्या फ्लॅट धारकांकडून २७ लाख ८० हजार रुपये घेऊन त्याचा हिशेब जेठाणी यांना न देता सोल सेलिंग करारनाम्याचा भंग केला. प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँकेत राजमाता कन्स्ट्रक्शनच्या नावाने दुसरे समांतर चालू खाते उघडून त्यात परस्पर पैसे ट्रान्सफर करवून घेतले, असा आरोप आहे.