पुणे : एका क्रीडांगणाला नाव देण्यावरून महापालिकेत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकेचा पती आणि महापौर यांच्यात वादविवाद झाला. आणखी एका प्रस्तावावरून राष्ट्रवादी आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये वाद झाला. त्यामुळे महापालिकेच्या वास्तूंच्या नामकरणावरून राजकीय नाट्य अनुभवायला मिळाले.

औंध येथील स्व. इंदिरा गांधी शाळेच्या आवारातील क्रीडांगणाला भाजपच्या नगरसेविका अर्चना मुसळे यांनी दिलेला योगीराज रामचंद्र मुसळे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव नाव समितीमध्ये आधी मंजूर झाला आहे. यावर स्थानिक नागरिकांनी आक्षेप घेत शाळेला इंदिरा गांधी यांचे नाव असताना मैदानाला दुसरे नाव का, अशी तक्रार त्यांनी भाजप नेत्यांकडे केली.

२०२४ च्या निवडणुकीसाठी काँग्रेस तयारीला, पुण्यात कार्यक्रर्त्यांना सूचना
गुरुवारी ऑनलाइन झालेल्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव आल्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार उपमहापौर सुनीता वाडेकर यांनी त्याला उपसूचना देऊन हा विषय दोन महिने पुढे ढकलला. त्यावर अर्चना मुसळे यांनी ‘माझा विषय असताना दुसऱ्या नगरसेवकाची उपसूचना कशी काय घेता,’ असा प्रश्‍न केला. त्यानंतर मुसळे व त्यांचे पती महापालिकेत आले.

सभागृहनेते व महापौरांशी चर्चा करीत असताना मुसळे यांचे पती आणि महापौर मोहोळ यांच्यात जोरदार वादावादी झाली. पण काही नगरसेवकांनी हस्तक्षेप करून वातावरण शांत केले. वादविवाद न करता आम्ही चर्चा करून मार्ग काढल्याचे मोहोळ व मुसळे यांनी सांगितले.

प्रभाग क्रमांक ३१ मध्ये खेळाच्या मैदानास लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे याचे नाव देण्याचा प्रस्ताव होता. त्यास नगरसेविका लक्ष्मी दुधाणे यांनी आक्षेप घेतला. ‘या कामासाठी मी निधी खर्च केला आहे आणि दुसरे नगरसेवक कसे नाव देत आहेत,’ असा आक्षेप दुधाणे यांनी घेतला. त्यावर अभिप्राय घेऊन हा विषय मांडल्याचे मेंगडे म्हणाले. यावरून वाद झाला; मात्र प्रशासकीय अभिप्राय असल्याने विषयाला मान्यता देण्यात आली.
सुरेखा पुणेकरांच्या अडचणी वाढणार?, प्रवीण दरेकर यांची न्यायालयात धाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here