नागपूर : सरकारी कार्यालयांना मिळणाऱ्या सुट्यांचे प्रमाण हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. ‘तुमचे तर बुवा सरकारी काम आहे’, असे टोमणे अनेकदा मारले जातात. अलीकडेच भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाच्या दुसऱ्या दिवशी राज्य सरकारने सुटी जाहीर केली होती. मात्र, जिल्हा न्यायालये ही सुटी भरून काढणार आहेत. या सुटीच्या बदल्यात न्यायालये एका सुटीच्या दिवशी कार्यरत राहतील.

गानसम्राज्ञी लतादीदींचे ५ फेब्रुवारीला निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर ६ फेब्रुवारीला अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनानिमित्त राज्य सरकारने शोक म्हणून ७ फेब्रुवारीला सुटी जाहीर केली. सर्व सरकारी कार्यालयांना ही सुटी लागू होती. यात राज्यातील जिल्हा व उच्च न्यायालयांचाही समावेश होता. या दिवशी राज्यातील सर्व जिल्हा न्यायालयांचे कामकाज बंद होते. मात्र, न्यायालये आता ही सुटी भरून काढणार आहेत. या सुटीची भरपाई म्हणून सुरुवातीला शनिवार, २६ फेब्रुवारीला काम करण्याचे ठरले होते. तसे परिपत्रकही निघाले होते. मात्र, २६ फेब्रुवारीला राज्यातील सर्व जिल्हा व सत्र न्यायालयांतील न्यायाधीशांची वार्षिक बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे आता एप्रिलच्या दुसऱ्या शनिवारी अर्थात ९ एप्रिल रोजी नागपूर जिल्हा न्यायालय कार्यरत राहील, असा आदेश नागपूरचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. अग्रवाल यांनी काढला आहे.

Weather Alert : पुढील ५ दिवस ‘या’ राज्यांना पावसाचा इशारा, तापमानात होणार वाढ
सरकारी कार्यालयांकडे लक्ष

सरकारी कर्मचाऱ्यांना खूप सुट्या असतात तसेच सरकारी कार्यालयांच्या कामाच्या वेळाही ठरलेल्याच असतात अशी ओरड खासगी क्षेत्रातील कर्मचारी करीत असतात. जिल्हा न्यायालयाने घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक होते आहे. अशात आता सरकारी कार्यलये असा निर्णय घेतात का? याकडे लक्ष लागले आहे.

नागरिकांनो लक्ष द्या, अन्यथा शहराचा पाणीपुरवठा होईल बंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here