Shivjayanti 2022 Two And A Half Tons Of Flowers Showered On Two Hundred Statues From A Helicopter | दोनशे पुतळ्यांवर हेलिकॉप्टरमधून तब्बल साडेतीन टन फुलांची पुष्पवृष्टी
औरंगाबाद : एक दिवसावर येऊन ठवलेली शिवजयंती जल्लोषात साजरी करण्यासाठी शिवप्रेमींकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. तर औरंगाबाद जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांसह इतर महापुरुषांच्या पुतळ्यांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. यासाठी जय्यत तयारी सुरू असून, १८ आणि १९ फेब्रुवारी असे दोन दिवस ही पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याची माहिती विनोद पाटील यांनी दिली आहे.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, यावर्षी सुद्धा नेहमीप्रमाणे हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार असून, शिवरायांच्या पुतळ्यासह इतर २०० महापुरुषांच्या पुतळ्यांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे. Weather Alert : राज्यात १९ तारखेपासून पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट यासाठी रतलाम, इंदोर, बडोदा, अहमदाबाद, शिर्डी, अमरावती, नाशिक, नांदेड तसेच औरंगाबादच्या ग्रामीण भागातून एकूण साडे तीन टन फुले आणण्यात आले आहे. त्यामुळे याही वर्षीचा शिवजन्मोत्सव अतिशय उत्साहात व थाटात संपन्न होणार असल्याचं पाटील म्हणाले.
रात्री १२ वाजेपर्यंत जल्लोष…
शहरातील क्रांती चौकात बसवण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. १० वाजत सुरू होणाऱ्या या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी यांनी आपल्या विशेष अधिकारातून १२ वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यात एकमेव औरंगाबाद शहरात शिवजयंतीचा उत्साह रात्री १२ वाजेपर्यंत चालणार आहे.