मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत विरूद्ध भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी थांबताना दिसत नाहीत. आता संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर नवीन खळबळजनक आरोप केला आहे. अन्वय नाईक यांना आत्महत्या का करावी लागली याच्यावर हे लोक काही बोलत नाहीत. त्यावर भाजपच्या लोकांनी बोललं पाहिजे. भाजपच्या दबावामुळे नाईक यांनी आत्महत्या केली. या किरीट सोमय्यांनी अन्वय नाईक यांना दोन वेळा धमकी दिली, असा नवा गंभीर आरोप करून राऊत यांनी खळबळ उडवून दिली. सोमय्या पिता-पुत्र दोघेही लवकरच जेलमध्ये जाणार असा दावा पुन्हा राऊत यांनी केला.

नारायण राणेंवर शिवसेना नेत्याची सडकून टीका; म्हणाले, तेव्हा लोटांगण घालत…
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज, शुक्रवारी पुन्हा किरीट सोमय्या यांच्यावर हल्लाबोल केला. किरीट सोमय्या कोण आहे? इथे-तिथे फिरून बंगले शोधत आहेत. तुरुंगात जाण्याचा मार्ग ते शोधत आहेत, असं राऊत म्हणाले. ठाकरे कुटुंबीयांच्या १९ बंगल्याबाबत विचारलं असता, यावर वारंवार स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्या जमिनीवर एकही बंगला नाही. अदृश्य झालेले आहेत. हा भुताटकीचा प्रकार वाटतो. भाजपच्या नेत्यांना भुताटकी झाली आहे. त्यांच्या स्वतःच्या बेनामी मालमत्ता आहेत, म्हणून ते बोंबलत सुटले आहेत, असा टोला राऊत यांनी यावेळी लगावला.

करोना नियमभंगाप्रकरणी सोमय्या यांना नोटीस

‘बाप-बेटे लवकरच जेलमध्ये जाणार’

संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा तोफ डागली आहे. बंगले, जमिनी शोधत इकडे-तिकडे फिरत आहेत. ते तुरुंगात जाण्याचा रस्ता शोधत आहेत. लवकरच जनता त्यांनी धिंड काढतील, असं राऊत म्हणाले. बंगले त्यांच्या स्वप्नात येतात. कुठे आहेत ते बंगले दाखवा. बंगले अदृश्य झाले आहेत. यांच्या स्वतःच्या मालमत्ता असल्याने ते दुसऱ्यांवर आरोप करत सुटले आहेत, असंही राऊत म्हणाले. किरीट सोमय्या चोर आहेत, असे सांगतानाच, हे बाप-बेटे लवकरच तुरुंगात जाणार, असा दावाही त्यांनी केला.

कोर्लई गावच्या दौऱ्या आधीच सरपंच आणि सोमय्यांमध्ये खडाजंगी

रश्मी ठाकरे एकेरी नाव घेतल्याची चूक किरीट सोमय्यांच्या लक्षात आली तेव्हा

सोमय्यांनी अन्वय नाईक यांना दोनदा धमकावले, राऊतांचा आरोप

अन्वय नाईक जागेचे मूळ मालक होते. त्यांना आत्महत्या का करावी लागली, यावर भाजप बोलत नाही. त्यांना त्रास देणाऱ्यांच्या समर्थनार्थ भाजप नेते उभे राहिले. भाजपच्या नेत्यांच्या दबावामुळे अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला. अन्वय नाईक हे मराठी उद्योजक होते. त्यांच्या कामाचे पैसे मिळाले नाहीत. मला या प्रकरणात नवीन माहिती मिळाली आहे. किरीट सोमय्या यांनी अन्वय नाईक यांना दोनदा धमकी दिली, असा नवीन आरोप करून राऊत यांनी खळबळ उडवून दिली. भाजपकडून मराठी माणसाला संपवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अन्वय नाईक हे मराठी उद्योजक होते, असेही ते म्हणाले. किरीट सोमय्या हे चोर आहेत. त्यांच्याविरोधात खंडणीचे गुन्हे दाखल होऊन ते बाप-बेटे लवकरच जेलमध्ये जाणार आहेत, असा दावाही त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here