मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद सुरू असतानाच, आता शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेने नारायण राणे यांना नोटीस बजावली आहे. राणे यांच्या जुहू येथील बंगल्याची पाहणी आणि बेकायदा बाधकामाची मोजणी करण्यासंदर्भात ही नोटीस बजावली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना वाद सुरूच आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या आणि भाजप नेत्यांवर आरोप केले होते. त्यानंतर लगेच नारायण राणे यांनीही पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांच्यावर टीका तर केलीच, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला होता. त्यामुळे राणे आणि शिवसेना वाद दिवसेंदिवस चिघळत आहे. असे असतानाच आता मुंबई महापालिकेकडून राणे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. जुहू येथील बंगल्याच्या पाहणी आणि मोजणीसंदर्भात ही नोटीस आहे.

Sanjay Raut and Kirit Somaiya : संजय राऊत यांचा किरीट सोमय्यांवर नवीन खळबळजनक आरोप
मुंबईतील प्रभाग पुनर्रचनेचे काय होणार?

मुंबई महापालिकेच्या के वेस्ट वॉर्ड (अंधेरी वेस्ट) द्वारे वॉर्ड अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने ही नोटीस राणे यांना पाठवण्यात आली आहे. एमएमसी अॅक्ट अंतर्गत सेक्शन ४८८ अन्वये ही नोटीस बजावण्यात आली आहे. के-वेस्ट वॉर्ड आणि इमारत प्रस्ताव विभागाचे पथक शुक्रवारी जुहू तारा रोडवरील अधिश बंगल्यावर येऊन तपासणी आणि बेकायदा बांधकामाबाबत मिळालेल्या तक्रारीची खात्री करून घेणार आहेत, असे या नोटिशीत म्हटले आहे. बंगल्याच्या बांधकामासंदर्भातील कागदपत्रे तयार ठेवावीत, असेही या नोटिशीत म्हटले आहे.

रश्मी ठाकरे एकेरी नाव घेतल्याची चूक किरीट सोमय्यांच्या लक्षात आली तेव्हा

राणेंच्या बंगल्यात बेकायदा बांधकाम झाल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली होती. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने दौंडकर यांनी पुन्हा महापालिका प्रशासनाला यासंदर्भात स्मरणपत्र पाठवले. त्यानंतर आता महापालिका प्रशासनाने ही कार्यवाही सुरू केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here