वॉशिंग्टन, अमेरिका :

अफगाणिस्तानातील सद्य परिस्थितीबद्दल अफगाणिस्तान प्रकरणाचे अमेरिकेचे राजदूत थॉमस वेस्ट यांनी भाष्य केलंय. अफगाणिस्तानातील परिस्थितीला त्यांनी पाकिस्तानला जबाबदार धरलंय.

अफगाणिस्तानमधील संघर्ष संपवण्याच्या कराराच्या संदर्भात पाकिस्तानकडून अमेरिकेला अधिक सार्थक आणि सुसंगत पद्धतीनं सहकार्य मिळालं असतं तर ‘आज आपण वेगळ्या ठिकाणी असतो’, असं थॉमस वेस्ट यांनी म्हटलंय.

वेस्ट यांच्याकडे ऑक्टोबर २०२१ मध्ये अफगाणिस्तानसाठी अमेरिकेच्या विशेष प्रतिनिधी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. अमेरिकन आणि नाटो सैन्याने माघार घेतल्यानंतर आणि तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेच्या उद्दिष्टांवर काम करण्याची जबाबदारी वेस्ट यांच्याकडे आहे.

अमेरिका-रशियामध्ये राजनैतिक संघर्ष, अमेरिकन उच्चाधिकाऱ्याची रशियानं केली हकालपट्टी
​Ukraine Russia Crisis: युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी कंट्रोल रुमची स्थापना, हेल्पलाईन जारी
‘चर्चेदरम्यान, जानेवारी ते ऑगस्ट आणि त्याअगोदरच्या वर्षांत आम्ही पाकिस्तानच्या नेतृत्वाशी काही पावलांसंबंधी चर्चा करत होतो’ असा खुलासाही वेस्ट यांनी यावेळी केला.

मंगळवारी वॉशिंग्टनमध्ये अमेरिका आणि तालिबानशी अमेरिकेच्या चर्चा या विषयावर ते बोलत होते. हा संघर्ष चर्चेनं सोडवण्याचे प्रयत्न वाढवण्याचं आवाहन अमेरिकेनं पाकिस्तानला केल्याचंही वेस्ट यांनी म्हटलंय.

Storm Eunice: ‘युनिस’ चक्रीवादळाचा धोका, नेदरलँडकडून १६७ उड्डाणं रद्द
Online Gambling Addiction: करोनाकाळात ‘ऑनलाइन गॅम्बलिंग’चे व्यसन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here