मुंबई: ऑनलाइन मोबाइल गेमच्या वेडापायी मुलांनी आपला जीव गमावल्याच्या घटना अलीकडच्या काळात घडलेल्या आहेत. मुंबईतही अशीच एक घटना उघडकीस आली आहे. मोबाइल गेमच्या नादात एका १३ वर्षीय मुलानं गळफास घेऊन आत्महत्या केली. दादरमध्ये ही घटना घडली असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मुंबईतील दादरमधील हिंदमाता परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. १३ वर्षीय मुलानं गळफास घेऊन आत्महत्या केली. मोबाइल गेम खेळताना टास्क पूर्ण करण्याच्या नादात त्याने हे पाऊल उचलल्याचा संशय आहे. भोईवाडा पोलीस यासंदर्भात तपास करत आहेत. त्याने नेमकी कशामुळे आत्महत्या केली, या कारणांचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली.

भरधाव कार दुभाजकावरून विरूद्ध दिशेकडील रिक्षा, दुचाकीला धडकली; भिवंडीत विचित्र अपघातात ९ जखमी
Bird flu : राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव; ठाण्यातील पोल्ट्रीतील शेकडो कोंबड्या दगावल्या

१३ वर्षीय मुलगा सातवी इयत्तेत शिकत होता आणि तो ऑनलाइन मोबाइल गेमच्या आहारी गेला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, मुलाचे वडील एका खासगी कंस्ट्रक्शन कंपनीत काम करतात. मुलाने त्यांना रविवारी संध्याकाळी फोन केला. त्यावेळी ते आपल्या पत्नीसोबत बाहेर गेले होते. प्रवासात असल्याने ते फोन उचलू शकले नाहीत. मात्र, काही वेळाने त्यांनी मुलाला फोन केला. त्यावेळी समोरून फोन उचलला नाही. पालकांची चिंता वाढली. त्यांनी तात्काळ घर गाठले. घरी पोहोचल्यानंतर आतून दरवाजा लावल्याचे दिसले. त्यांनी दाराच्या वरच्या बाजूस असलेली काच फोडली आणि दरवाजा उघडला. त्यावेळी मुलाचा मृतदेह त्यांना आढळून आला. या घटनेनंतर भोईवाडा पोलिसांना माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. मुलाचा मृतदेह विच्छेदनासाठी तात्काळ रुग्णालयात नेण्यात आला.

molestation: ‘तो’ लहान मुलीचा विनयभंग करून पळून जात होता; अखेर झाला गजाआड

पोलिसांनी प्राथमिक तपास केला असता, मुलाला ऑनलाइन मोबाइल गेम खेळण्याचे वेड होते. मात्र, त्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मुलगा खूपच हुशार होता. त्याला क्रिकेटची आवड होती, अशीही माहिती पोलिसांना मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. मुलगा ऑनलाइन मोबाइल गेम खेळायचा. त्याच्या ग्रुपमध्ये कोण-कोण होते, त्याच्यासोबत ग्रुपमध्ये कोणती मुले खेळत होती याचा शोध घेतला जात आहे. गेम खेळताना काही असं घडलं का, की मुलाने इतके टोकाचे पाऊल उचलले, याचाही तपास केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here