पुणे : पुण्यासह राज्याच्या विविध भागांत येणारा बहुतांश गांजा हा मराठवाडामार्गे येत असल्याचे पोलिसांच्या तपासात आढळून आले आहे. मराठवाड्यात प्रामुख्याने येणारा गांजा कर्नाटक, आंध्र व ओडिशा येथून रस्तेमार्गे येत असून, त्यानंतर त्याची तस्करी राज्याच्या विविध भागांत केली जाते. अमली तस्कर सध्या मराठवाड्याचा गांजा तस्करीसाठी ‘डम्पिंग ग्राउंड’ म्हणून वापर करीत आहेत. त्यामुळे तपास यंत्रणांनी मराठवाड्यातील या तस्करांकडे लक्ष वळविले आहे.

पुणे शहरात अमली पदार्थ तस्करांवर कारवाईसाठी स्थापन केलेल्या दोन अमली पदार्थविरोधी पथकांकडून सन २०२१मध्ये गांजाविक्री करणाऱ्यांवर ४१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात ६७ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एक कोटी ११ लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. पुणे पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने गांजा विक्री करताना अटक केलेल्या आरोपींकडे चौकशी करून तस्करीचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी अमली पदार्थांच्या गुन्ह्यात अलीकडे मराठवाड्यातील आरोपी जास्त असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी गांजा तस्करीची माहिती दिली. मराठवाड्यात प्रामुख्याने कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि ओडिशा येथून रस्तेमार्गे गांजा येतो. मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, नांदेड व पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर या जिल्ह्यांच्या सीमा इतर राज्यांना लागून आहेत. त्यामुळे या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात गांजा आणून ठेवला जातो. त्यानंतर मागणीनुसार राज्यातील विविध शहरांत पाठविला जातो. गोवा व मुंबईकडे पाठविला जाणारा गांजा हा पुण्यामार्गेच जात असल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे या ठिकाणाहून येणाऱ्या गांजाकडे पोलिसांनी लक्ष वळविले आहे.

मंत्र्यांचा वडापाव व्हिडीओ व्हायरल; वडापावचे बिल भरलेच नाही, बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर…
गेल्या काही दिवसांत अमली पदार्थ विरोधी पथकाने पुण्यात गांजा तस्करी करणाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर मराठवाड्यातून गांजा घेऊन आल्याचे त्यांनी सांगतले. या ठिकाणी ओडिशा, कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून गांजा आणला जातो. त्यानंतर राज्याच्या विविध भागांत पाठविला जात असल्याचे आढळून आले आहे.

सांगलीत गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट: चार घरे जळाली; आग विझवताना कर्मचारी जखमी

– विनायक गायकवाड, वरिष्ठ निरीक्षक, अमली पदार्थविरोधी पथक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here