छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांचे राजवाडे हे आपल्याला अभिप्रेत आहे. प्रत्येक क्षेत्रातील दिग्गज मंडळींचा एक इतिहास आहे. पाश्चिमात्त्य देशात या इतिहासाचा सखोल अभ्यास केला जातो आणि अभ्यास म्हणूनच इतिहासाकडे पाहिले जाते. परंतु पाश्चिमात्य देशांनी या गुणांच्या जोरावर एकेकाळी अर्धे जग पादाक्रांत केले असे मोघे म्हणाले.

 

Shivaji Maharaj history

पाश्चिमात्त्य देशात या इतिहासाचा सखोल अभ्यास केला जातो आणि अभ्यास म्हणूनच इतिहासाकडे पाहिले जाते.

हायलाइट्स:

  • अर्थकारण हा महाराजांकडे असलेला सर्वात मोठा गुण होता
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुण वैशिष्ट्यांचा उलगडा
कल्पेश गोरडे, ठाणे : पाश्चिमात्त्य देशात इतिहासाचा सखोल अभ्यास केला जातो आणि अभ्यास म्हणूनच इतिहासाकडे पाहिले जाते. परंतु भारतीय समाज चित्रपट, मालिकांच्या माध्यमातून याच इतिहासाकडे करमणूक म्हणून पाहतो. आपल्याला इतिहास पाहायला आवडतो, परंतु इतिहासाच्या अध्ययनाकडे आपण वळत नाही अशी खंत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक अजित मोघे यांनी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे व्यवस्थापन’ या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यासाठी आले होते त्या कार्यक्रमा दरम्यान इतिहास अभ्यासक अजित मोघे यांनी खंत व्यक्त केली. (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022)
Shiv Jayanti: शिवरायांना अनोखी मानवंदना; ६००० रोपांच्या माध्यमातून साकारली शिवरायांची प्रतिमा
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांचे राजवाडे हे आपल्याला अभिप्रेत आहे. प्रत्येक क्षेत्रातील दिग्गज मंडळींचा एक इतिहास आहे. पाश्चिमात्त्य देशात या इतिहासाचा सखोल अभ्यास केला जातो आणि अभ्यास म्हणूनच इतिहासाकडे पाहिले जाते. परंतु पाश्चिमात्य देशांनी या गुणांच्या जोरावर एकेकाळी अर्धे जग पादाक्रांत केले असे मोघे म्हणाले. अर्थकारण हा महाराजांकडे असलेला सर्वात मोठा गुण होता. त्यांनी अर्थार्जनाचे महत्त्व पहिल्या दिवसापासून ओळखले होते. कोणतेही राज्य चालवण्यासाठी आर्थिक सुबत्ता ही असावीच लागते. वारंवार येणाऱ्या आक्रमणांमुळे शेतीतून आपल्याला मिळणारा कर हा फारसा नसणार म्हणून त्यांचे सगळे लक्ष हे व्यापार आणि त्या व्यापारातून मिळणारे कर आणि जकातीवर देखील होते. महाराजांच्या लष्करी हालचाली पाहिल्या तर व्यापाऱ्याची आणि दळणवळणाची साधने ही आपल्या ताब्यात ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येत असल्याचे सांगत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुण वैशिष्ट्यांचा उलगडा यावेळी मोघे यांनी केला.
धक्कादायक! शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण सुरू असतानाच औरंगाबादमध्ये स्टेज कोसळला
राजकारण करत असताना शब्दाला किती किंमत असते हे महाराजांनी आपल्याला अनेक उदाहरणांवरून दाखवून दिले आहे. किल्ल्यांबाबत महाराजांची आर्थिक गणिते सांगताना मोघे म्हणाले की, १६७२ साली त्यांनी मांडलेले जाबिता खत म्हणजेच आर्थिक बजेट हे ऐतिहासिक कागदपत्रांत पाहायला मिळते. महाराजांनी किल्ल्यांवर इतका पैसे खर्च केला होता की, शत्रूला माझा एक किल्ला जिंकायला एक वर्षे लागेल तर माझे ३६० किल्ले जिंकायला किंबहुना माझे राज्य जिंकायला ३६० वर्षे लागतील इतके सोपे गणित त्यांनी मांडले होते. महाराजांमधला एचआरडी तज्ज्ञ हा गुण देखील दिसून येतो, योग्य माणसांची योग्य जागेसाठी त्यांनी निवड केली होती. मध्ययुगात जगभर प्रशासकीय कामे लष्कराच्या माध्यमातून करण्याची पद्धत असताना महाराजांनी लष्कराचा अधिकार काढून त्याजागी प्रशासकीय अधिकारी नेमले. थोडक्यात भारतीय प्रशासकीय सेवेच्या संज्ञेचा उगम महाराजांच्या संकल्पनेत आढळतो असेही त्यांनी शेवटी सांगितले. मात्र दुर्दैवाने भारतीय समाज या इतिहासाकडे चित्रपट, मालिकांच्या माध्यमातून करमणूक म्हणून पाहत असून इतिहासाच्या अध्ययनाकडे वळत नाही अशी खंत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक अजित मोघे यांनी व्यक्त केली.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : shivjayanti 2022 our society watch shivaji maharaj history as a mere entertainment says historian ajit moghe
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here