आज शिवजयंती आहे. हा मुद्दा आत्ता उपस्थित करण्याचे कारण नाही. या व्यासपीठावर मी, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे-पाटील बसलो आहोत. आम्ही पण मराठ्याच्या पोटीच जन्माला आलो आहोत ना. मग आम्हाला आमच्या जातीचा आणि समाजाचा अभिमान नाही का?

 

Ajit Pawar Maratha

उपमुख्यमंत्री अजित पवार

हायलाइट्स:

  • अजित पवार यांचं भाषण सुरु असताना ते ओबीसी आरक्षणाबाबत बोलत होते
  • तितक्यात खाली बसलेल्या गर्दीतून एका तरूणाने सर्वांदेखत मराठा आरक्षणावरून अजित पवार यांना जाब विचारायला सुरुवात केली
पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर आयोजित करण्यात आलेल्या समारंभादरम्यान घडलेल्या एका प्रसंगाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. किल्ले शिवनेरीवर शिवजन्माचा सोहळा पार पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले. अजित पवार यांचं भाषण सुरु असताना ते ओबीसी आरक्षणाबाबत बोलत होते. तितक्यात खाली बसलेल्या गर्दीतून एका तरूणाने सर्वांदेखत मराठा आरक्षणावरून अजित पवार यांना जाब विचारायला सुरुवात केली. तेव्हा अजित पवार यांनी तरुणाला शांत बसवायचा प्रयत्न केला. तरीही हा तरूण बोलतच होता. तेव्हा अजित पवार चांगलेच संतापले. त्यांनी म्हटले की, तुम्हाला मी मगाशी बोलून दिले आहे. ही बोलायची पद्धत नव्हे. तुम्ही कोणाची सुपारी घेऊन आलायत का, अशा शब्दांत अजित पवार यांनी संबंधित तरुणाला चांगलेच झापले. (DCM Ajit Pawar at kille shivneri)

आज शिवजयंती आहे. हा मुद्दा आत्ता उपस्थित करण्याचे कारण नाही. या व्यासपीठावर मी, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे-पाटील बसलो आहोत. आम्ही पण मराठ्याच्या पोटीच जन्माला आलो आहोत ना. मग आम्हाला आमच्या जातीचा आणि समाजाचा अभिमान नाही का? शिवबांनी आपल्याला काय शिकवलंय? छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन केले होते. ही गोष्ट सगळ्यांनाच मान्य करावी लागेल. तरुण मुलांचं रक्त सळसळतं असतं. पण मराठा आरक्षणाचा प्रश्न हा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. यामधील कायेदशीर बारकावेही लक्षात घेतले पाहिजेत, असे अजित पवार यांनी म्हटले. बाळसााहेब थोरात, सीताराम कुंटे, मुख्यमंत्री आणि मी असे चार-पाचजण पंतप्रधानांना भेटलो. आम्ही पंतप्रधानांकडे १२ मागण्या केल्या. त्यातील मराठा आरक्षणाची पहिली मागणी होती. पंतप्रधानांनी चर्चा करण्याचं आश्वासन दिलं होतं, असेही अजित पवार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी संभाजीराजे छत्रपती यांनीही मराठा आरक्षणासाठी घेतलेल्या उपोषणाच्या भूमिकेवर फेरविचार करण्याचे आवाहन केले. तत्पूर्वी किल्ले शिवनेरीवर शिवजन्माचा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला अजित पवार, बाळासाहेब थोरात आणि आदित्य ठाकरे हे उपस्थित होते.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : ajit pawar slams youth after create interruption in speech over maratha reservation at kille shivneri
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here