बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी शिवसेना काढली. पण आता शिवसेनेचे पक्षप्रमुखच मराठी माणसाच्या मुळावर उठले आहेत, अशी टीका नारायण राणे यांनी केली. ते शनिवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

Narayan CM Uddhav

उद्धव ठाकरे आणि नारायण राणे

हायलाइट्स:

  • नारायण राणे यांना जुहूतील बंगल्यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेकडून नोटीस बजावण्यात आली
  • या घरात मी १७ सप्टेंबर २००९ रोजी राहायला आलो
मुंबई: महानगरपालिकेने जुहूतील बंगल्याच्या पाहणीसंदर्भात नोटीस बजावल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे कुटुंबीयांवर पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे यांनी मातोश्री-१, मातोश्री-२ बांधले. तेव्हा आम्ही काही म्हणालो का? भाजप-शिवसेनेची सत्ता असताना पैसे देऊन मातोश्रीवरील अनधिकृत बांधकाम नियमित करण्यात आले. माझ्याकडे दोन्ही मातोश्रीचे आराखडे आहेत. पण मी कधीही कोणाच्या घराविषयी काही बोलत नाही. परंतु, माझ्या जुहूतील बंगल्याविषयी राजकीय सूडबुद्धीने कारवाई होत आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी शिवसेना काढली. पण आता शिवसेनेचे पक्षप्रमुखच मराठी माणसाच्या मुळावर उठले आहेत, अशी टीका नारायण राणे यांनी केली. ते शनिवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
दिशा सालियनवर बलात्कार होत असताना फ्लॅटबाहेर कोणत्या मंत्र्याचे सुरक्षारक्षक होते; नारायण राणे यांचा सवाल
नारायण राणे यांना जुहूतील बंगल्यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत खुलासा केला. त्यांनी म्हटले की, या घरात मी १७ सप्टेंबर २००९ रोजी राहायला आलो. ही इमारत नामांकित वास्तूविशारदाने बांधली आहे. या इमारतीला त्यावेळी महापालिकेने ऑक्युपेशन आणि पझेशन सर्टिफिकेट दिले होते. घर घेताना मी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या होत्या. २००९ नंतर घरात नव्याने एक इंचही बांधकाम करण्यात आलेले नाही. या घरात आम्ही ८ माणसं राहतो. याठिकाणी कोणतेही हॉटेल किंवा व्यावसायिक गोष्टी चालत नाहीत. ही १०० टक्के रहिवासी इमारत आहेत. तरीही शिवसेनेचे काही नेते आणि मातोश्रीकडून सातत्याने काही लोकांना या इमारतीच्या विरोधात तक्रार दाखल करायला सांगितली जाते. यापूर्वीच पालिकेनेही संबंधितांना या इमारतीत अनधिकृत बांधकाम नसल्याचे कळवले आहे. राजकीय सूडबुद्धीने हा सर्व प्रकार सुरु असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला.
दुसरा कोणी असता तर अशा परिस्थितीत पदावर राहिला नसता; राणेंचा उद्धव ठाकरेंना बोचरा टोला
‘दिशा सालियनवर बलात्कार होत असताना फ्लॅटबाहेर कोणत्या मंत्र्याचे सुरक्षारक्षक होते?’

दिशा सालियन हिच्यावर बलात्कार होत असताना फ्लॅटबाहेर कोणत्या मंत्र्याचे सुरक्षारक्षक होते, असा सवाल उपस्थित करत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी या प्रकरणाला नव्याने वाचा फोडली आहे. ८ जूनला दिशा सालियन हिची बलात्कार करून हत्या झाली. ही गोष्ट अभिनेता सुशांत सिंह याला समजली. तेव्हा सुशांत सिंह राजपूत याने याबद्दल आवाज उठवायचा निर्णय घेतला. त्यामुळे सुशांत सिंह यालाही त्याच्या घरी जाऊन ठार मारण्यात आले, असा खळबळजनक दावा नारायण राणे यांनी केला. ते शनिवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी नारायण राणे यांनी दिशा सालियन आणि सुशांत सिंह मृत्यूप्रकरणाविषयी काही सवाल उपस्थित केले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : i never speak about illegal construction in matoshree narayan rane befitting reply after bmc notice to juhu bungalow
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here