मी राज्यभरात पक्षाच्या कामासाठी फिरत असतो. माझ्या गाडीला महिनाभरात झालेला हा तिसरा अपघात आहे. काही दिवसांपूर्वी मालेगावमध्ये त्यानंतर खंडाळ्यात माझ्या गाडीचा अपघात झाला होता.

 

Pravin Darekar (1)

प्रवीण दरेकर यांच्या गाडीचा अपघात

हायलाइट्स:

  • मी राज्यभरात पक्षाच्या कामासाठी फिरत असतो
  • माझ्या गाडीला महिनाभरात झालेला हा तिसरा अपघात आहे
मुंबई: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील गाडीचा शनिवारी सकाळी मुंबईत अपघात झाला. मुंबईच्या जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर ही घटना घडली. गेल्या महिनाभरात प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्या गाडीचा अपघात होण्याची ही तिसरी घटना आहे. त्यामुळे यामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर हे याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार आहेत.

या अपघातानंतर प्रवीण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी म्हटले की, मी राज्यभरात पक्षाच्या कामासाठी फिरत असतो. माझ्या गाडीला महिनाभरात झालेला हा तिसरा अपघात आहे. काही दिवसांपूर्वी मालेगावमध्ये त्यानंतर खंडाळ्यात माझ्या गाडीचा अपघात झाला होता. दरवेळी गाडीसमोर बाईकस्वार आल्यामुळे अपघात झाला आहे. आजदेखील मुंबईत असताना गाडीसमोर अचानक बाईकस्वार आला आणि गाडीचा अपघात झाला. त्यामुळे मला यामध्ये घातपाताचा संशय येत आहे. त्यामुळे मी या सगळ्याच्या चौकशीची मागणी करणार आहे. त्यासाठी मी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहणार असल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : bjp leader pravin darekar accident on vikhroli jogeshwari link road
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here