औरंगाबाद : वैजापूर तालुक्याचे शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांनी एका महिलेला मारहाण केल्याप्रकरणी अखेर वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार बोरणारे यांच्यासह एकूण ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या कार्यक्रमात का गेल्या होत्या म्हणून महिलेला मारहाण करण्यात आली असल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.

वैजापूर पोलीस ठाण्यात पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी गावात भाजपच्या शाखेच उद्घाटन करण्यात आलं. त्यामुळे या कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो. दरम्यान शुक्रवारी आम्ही वैजापूर येथील गोदावरी कॉलनीत एका कार्यक्रमाला आलो असता,आमदार रमेश बोरणारे यांनी मला भाजपच्या कार्यक्रमाला का गेल्या म्हणून बेदम मारहाण केल्याचा महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. तसेच आमदार बोरणारे यांनी रस्त्यावर खाली पाडून लाथानी मला मारलं असल्याचं महिलेनं म्हटलं आहे.

‘राजकारण कितीही गढूळ करा, शिवसेना तुरटीसारखं काम करेल’
या सर्व प्रकरणावर आम्ही आमदार बोरणारे यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला,मात्र त्याची बाजू कळू शकली नाही. मात्र, हे आमचं कौटुंबिक वाद असून, यावरून काही लोकं राजकारण करत असल्याचं बोरणारे काही माध्यमांशी बोलताना म्हणाले आहे.

धक्कादायक! शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण सुरू असतानाच औरंगाबादमध्ये स्टेज कोसळला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here