सिंधुदुर्गातील वेंगुर्ला तालुक्यात दुर्दैवी घटना घडली आहे. पेंडुर-रातवायंगणी येथे पुलाचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी दोन कामगारांचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. या घटनेची नोंद पोलिसांनी केली आहे.

 

Sindhudurg: दुर्दैवी घटना; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून २ कामगारांचा मृत्यू

हायलाइट्स:

  • मातीचा ढिगारा कोसळून दोन कामगारांचा जागीच मृत्यू
  • सिंधुदुर्गातील वेंगुर्ला तालुक्यातील धक्कादायक घटना
  • वेंगुर्ला पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू
सिंधुदुर्ग: वेंगुर्ला तालुक्यातील पेंडुर-सातवायंगणी येथे दुर्दैवी घटना घडली. पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी मातीचा ढिगारा कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पोहोचले असून, तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वेंगुर्ला तालुक्यातील सातवायंगणी येथे मातोंड पेंडुर सातवायंगणी ते घोडेमुखकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे काम सुरू आहे. या ठिकाणी आज, शनिवारी काम करीत असलेल्या दोन कामगारांच्या अंगावर मातीचा ढिगारा कोसळला. या ढिगाऱ्याखाली दोघेही कामगार दबले गेले. यात त्यांचा मृत्यू झाला. गोपीनाथ रामू राठोड (वय ५२, रा. कोळयाल तांडा, ता. हुनसगी, जिल्हा- यादगीर, कर्नाटक) आणि ओमप्रकाश तेजूनायक राठोड (वय ३२, रा. शेवालाल कॉलनी, येलगी तांडा, ता-हुनसगी जिल्हा-यादगीर, कर्नाटक) अशी दोघांची नावे आहेत. या अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Mumbai : वसुली प्रकरणात ३ बड्या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा; दोघे अटकेत, मुंबई पोलीस दलात खळबळ
Shivsena – Narayan Rane: शिवसेना-राणे वाद पुन्हा चिघळणार; सिंधुदुर्गातील ‘त्या’ ७ खुनांची फाइल पुन्हा उघडली जाणार?

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : sindhudurg two worker died on bridge construction site in vengurla
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here