मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोलीजवळ हा भीषण अपघात झाला. मुंबईच्या दिशेकडील मार्गिकेवर ट्रेलरने एका कारला धडक दिली. त्यानंतर काही अंतरावरच तीन कारनाही धडक दिली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. तर दोघे जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर घटनास्थळी आयआरबी पट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महामार्ग वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस ठाण्याची यंत्रणा, डेल्टा फोर्स, लोकमान्य आरोग्य सेवा यांनी मदतकार्य सुरू केले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अनिता सिंग (वय – ५४), अखिलेश सिंग (वय ५५, रा. रोसे – पारडे, पुणे) हे जखमी झाले आहेत. महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघा जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शिवज्योत आणण्यासाठी निघालेल्या शिवप्रेमींचा वरंध घाटात अपघात
असा झाला अपघात
ट्रेलर चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर अनियंत्रित ट्रेलरने आधी एका कारला धडक दिली. त्यानंतर काही अंतरावरच अन्य एका कारला धडक दिली. पुढे थोड्याच अंतरावर आणखी एका कारला धडक दिली. त्यानंतर अन्य एका कारला धडकला. त्यानंतर ट्रेलर महामार्गाच्या डाव्या बाजूला जाऊन कलंडला. ट्रेलरने एकूण चार वाहनांना धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, दोघे जण जखमी झाले आहेत. मृतांची नावे समजू शकलेली नाहीत. जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिला गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर सहा वाहनांचा भीषण अपघात; चौघांचा मृत्यू