ठाणे : कोणाच्या घरी लग्न असेल, तर त्याचं श्रेय घेतात आणि कोणाच्या घरी मुलगा झाला तरी, आमच्याच प्रेरणेतून झाला असल्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न अनेकांचा असतो, असा चिमटा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना काढला. राज्यात सुरू असलेल्या राजकारणातील श्रेयावादातून नाव न घेता फडणवीसांनी टोलेबाजी केली. ठाण्यात आज, शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यासाठी ते ठाण्यात आले होते. त्यावेळी एका कार्यक्रमादरम्यान तेथील उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

सध्या राज्यात श्रेयवादाचे राजकारण सुरू आहे. या राजकारणावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कुणाचेही नाव न घेता चिमटा काढला. अलीकडच्या काळात काही लोकांचा प्रॉब्लेम असा आहे की, ते कशाचेही श्रेय घेतात. म्हणजे एखाद्याच्या घरी लग्न असले तर त्याचे पण श्रेय घेतलं जातं आणि एखाद्या घरी मुलगा झाला तर तो आमच्या प्रेरणेतून झाला, अशा प्रकारे श्रेय घेण्याचे वेगवेगळे प्रयत्न अनेकांचे असतात, अशी बोचरी टीका त्यांनी केली. आपण काळजी करू नये, ज्याचं त्याचं श्रेय आहे, ज्याला-त्याला मिळत असतं आणि लोक ते देत असतात. आपण काम करत जायचं असत. त्यामुळे कोणी कितीही श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तरी, आपल्याला एकच प्रेरणा आहे. ती म्हणजे, शिवरायांची प्रेरणा. शिवरायांच्या प्रेरणेने आपण शेवटच्या माणसापर्यंत जाऊन काम करत राहायचं. आपण मिळेल ती संधी सामान्यांकरता वापरून, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच्या संघर्षासाठी वापरावी, असा सल्ला देखील यावेळी फडणवीस यांनी उपस्थितांना दिला.

Sanjay Raut : संजय राऊत पुन्हा कडाडले; म्हणाले, पुढच्या आठवड्यात….Shivsena – Narayan Rane: शिवसेना-राणे वाद पुन्हा चिघळणार; सिंधुदुर्गातील ‘त्या’ ७ खुनांची फाइल पुन्हा उघडली जाणार?

मोडकळीस आलेल्या इमारतींच्या संदर्भात ठाण्याचे भाजप आमदार संजय केळकर यांनी जो संघर्ष केला, त्या संघर्षामुळे या संदर्भातले सगळे नियम तयार झाले आणि ते नियम त्या काळात भाजप सरकारकडून मंजूर करण्यात आले होते. मात्र त्या नियमांना एका वर्षाचा कालावधी का लागला? त्याचे कारण माहीत नसून त्याला एक वर्ष उशीर झाला हे मान्य असल्याचे सांगत कदाचित श्रेयाकरिता हा उशीर झाला असेल, असा टोला फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.

Vaibhav Naik : खुनाची अनेक प्रकरणं उघड करता येतील; वैभव नाईक यांचा राणेंना इशारा?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here